hrikant shinde Ganpat Gaikawad sarkarnama
मुंबई

kalyan loksabha : 'गोळीबार करायला मी लावला का?'; श्रीकांत शिंदेंनी गायकवाड समर्थकांची केली बोलतीच बंद

Loksabha Election 2024 : विरोध करणाऱ्यांचा काही वैयक्तिक अजेंडा असेल तर तो त्यांनी वैयक्तिकरित्या राबवला पाहिजे. पक्षाचं नाव घेऊन युतीचं वातावरण खराब करू नये. गुडं प्रवृत्तीने कोणी वागत असतील तर त्यांचा काय अजेंडा आहे, हे स्पष्ट झालं पाहिजे.

Roshan More

Kalyan Loksabha : श्रीकांत शिंदे उमेदवार असतील तर आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांनी घेतली. मात्र, खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच कल्याणमधून श्रीकांत शिंदे उमेदवार असतील, असे जाहीर केले. त्यामुळे गणपत गायकवाड समर्थक काय भूमिका घेणारे याकडे लक्ष लागले असताना श्रीकांत शिंदे यांनी गोळीबार प्रकरणावरून गणपत गायकवाड यांनी डिवचले आहे.

गोळीबार मी करायला लावला का नाही ना . त्यांनी जे केलं ते शिक्षा भोगत आहेत. निवडणुकीच्या दरम्यान वातावरण खराब करण्याचे काम जर कोणी करत असेल, मला तर वाटतं ते भाजपचे पदाधिकारी नसतील. पण असतील तर वरिष्ठांनी त्यांना समज दिली पाहिजे, असे म्हणत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे ( Shrikant shinde ) यांनी समाचार घेतला.

विरोध करणाऱ्यांचा काही वैयक्तिक अजेंडा असेल तर तो त्यांनी वैयक्तिकरित्या राबवला पाहिजे. पक्षाचं नाव घेऊन युतीचं वातावरण खराब करू नये. परंतु, यांचा अजेंडा वातावरण खराब करण्याचा आहे, असेदेखील श्रीकांत शिंदेंनी सांगितले.

गणपत गायकवाड (Ganpat Gaikawad) यांनी शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणी गणपत गायकवाड तुरुंगात आहेत. त्यांनी श्रीकांत शिंदेंचा प्रचार करणार नसल्याची भूमिका घेतली होती. मात्र, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रीकांत शिंदेच्या पाठीशी भाजप उभी राहणार असल्याचे जाहीर केल्याने गणपत गायकवाडांचे समर्थक काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT