aaditya thackeray shrikant shinde sarkarnama
मुंबई

Kalyan Loksabha : 'कुवतीपेक्षा जास्त झेपत नाही', श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंना टोला

Shrikant Shinde On Aaditya Thackeray : कल्याण लोकसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, वरून सरदेसाई लढणार, असे सांगितले जात होते. मात्र, येथे केलेल्या विकासकामांमुळे त्यांची येथून लढण्याची हिंमत झाली नाही.

Roshan More

Loksabha Election 2024 : कल्याण लोकसभेची उमेदवारी श्रीकांत शिंदे यांना जाहीर झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच जणांचे बळी घेतले. ज्यांनी साथ दिला त्यांचा घात केला. श्रीकांत शिंदे यांची जागा देखील देवेंद्र फडणवीसांना जाहीर करावी लागली, असे आदित्य ठाकरे म्हणाले होते. त्याला श्रीकांत शिंदेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

ज्याची जी कुवत आहे त्याप्रमाणे त्यांनी वक्तव्य केले पाहिजे. आपल्या कुवती पेक्षा जास्त वक्तव्य झेपत नसेल तर करू नये, असे टोला आदित्य ठाकरेंना (Aaditya Thackeray ) श्रीकांत शिंदे यांनी लगावला. तसेच वरूण सरदेसाई यांना आपल्या विरोधात उमेदवारी देणार होते त्याचे काय झाले, असा सवाल देखील शिंदे यांनी सांगितले.

आपल्या प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरे यांना टार्गेट केले.कल्याण लोकसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, वरूण सरदेसाई लढणार, असे सांगितले जात होते. मात्र, येथे केलेल्या विकासकामांमुळे त्यांची येथून लढण्याची हिंमत झाली नाही. कल्याण लोकसभा मतदारसंघातून कार्यकर्त्याला पुढे करण्यात आले आहे. तुम लढो हम कपडे संभालते है, अशी वृत्ती ठाकरेंची असल्याची जहरी टीका श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वैशाली दरेकरांचा टोमणा

कल्याणमधील ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांची खिल्ली उडवली.तसेच "कीव येते ...करा ना जाहीर, करा ना जाहीर बोलत फडणवीसांनी एकदाचं केलं जाहीर.ही नामुष्की असल्याचे दरेकरांनी म्हणत श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी त्यांचा पक्षच जाहीर करू शकला नाही, असा टोमणा मारला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT