Kapil Patil Sarkarnama
मुंबई

Kapil Patil News : 'राहुल गांधी येवो अथवा अन्य कोणी, भिवंडी लोकसभेच्या निकालात...' ; कपिल पाटलांचा दावा!

Bhiwandi Lok Sabha Constituency : भिवंडी तसेच कळवा-मुंब्रा मतदारसंघात राहुल गांधी यांची यात्रा होणार आहे, या पार्श्वभूमीवर कपिल पाटलांनी विधान केलं आहे.

शर्मिला वाळुंज

Loksabha Election 2024 : 'राहुल गांधी यांनी 2014 मध्येसुद्धा भिवंडीत सभा घेतली होती. तेव्हा काही झालं नाही, तर आता दौरा करून काय होणार आहे?. लोक मोदीजींच्या विकासावर लक्ष ठेवून असून, त्यांच्यावरील विश्वासाला मत देणार आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांचा दौरा होवो किंवा इतर कोणाचा, भिवंडी लोकसभेच्या निकालात काही फरक पडत नाही,' असे उमेदवार कपिल पाटील यांनी ठासून सांगित यातून त्यांनी आपला विजय निश्चित असल्याचे दर्शवले आहे.

भारतीय जनता पार्टीचे राजस्थानचे क्रीडा मंत्री कर्नल राजवर्धन सिंह राठोड हे भिवंडी लोकसभा मतदारसंघात गुरुवारी आले होते. या वेळी त्यांनी कल्याण येथे मंत्री पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री राठोड यांनीदेखील काँग्रेसच्या दौऱ्याविषयी बोलताना म्हटले की, काँग्रेसजवळ ना विचार आहेत, नाही इच्छाशक्ती आहे.

पार्टटाइम पॉलिटिशन त्यांच्याकडे आहेत आणि मला वाटतं त्यांची एकच खेळी राहिली आहे की मोदी हेट. आणि त्या कारणामुळे ते पदभ्रष्टदेखील झाले. मोदींंना थांबवायच्या चक्करमध्ये राष्ट्राचा विकास थांबवायला ते लागले आहेत, हेच ते विसरून गेल्याचे राठोड यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रात भारत जोडो न्याय यात्रा सुरू असून, नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) हे यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधत आहेत. शुक्रवारी भिवंडी तसेच कळवा मुंब्रा मतदारसंघात राहुल गांधी यांची ही यात्रा होणार आहे.

याविषयी खासदार तथा महायुतीचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील(Kapil Patil) यांना विचारले असता ते म्हणाले, '2014 मध्येदेखील राहुल गांधी यांनी भिवंडीत सभा घेतली होती, तेव्हा काही झालं नाही. आता दौरा करून काय होणार आहे. लोक मोदींच्या विकासावर लक्ष ठेवून आहेत. विकासाच्या माध्यमातून मोदींनी जनतेचा जो विश्वास जिंकलेला आहे. त्या विश्वासाला लोक मत देणार आहेत. लोकांची मानसिकता सेट आहे.

2024ला फिर एक बार मोदी सरकार, अबकी बार चारसाै पार. यामुळे राहुल गांधींचा दौरा येवो नाही तर अजून काही येवो, भिवंडी लोकसभेच्या निकालात काही फरक पडत नाही,' असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT