Nilesh Lanke News: घड्याळ की तुतारी? पवारांच्या भेटीनंतर लंकेंचे इरादे स्पष्ट; म्हणाले,'साहेब सांगतील...'

Ahmednagar South Lok Sabha Constituency : 'शरद पवारांची विचारधारा कधीही सोडली नव्हती. यापुढेही पवारांच्या विचारधारेनेच काम करणार आहे. माझी विचारधारा आणि पक्ष एकच असून, आजही माझ्या कार्यालयात शरद पवार यांचा फोटो आहे.'
Nilesh Lanke - Sharad Pawar
Nilesh Lanke - Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दम भरल्यानंतरही पारनेरचे आमदार नीलेश लंकेंनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली. नगर दक्षिणमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक असलेले लंके शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना काही दिवसांपासून उधाण आले होते.

याच पार्श्वभूमीवर ते पुण्यात पवारांची भेट घेणार असल्याने त्यांची शरद पवार गटातील घरवापसी आणि नगर दक्षिणमधील उमेदवारीवर शिक्कामोर्तब होईल असे बोलले जात होते. पण पवारांनी नेहमीची त्यांची शैली कायम ठेवत लंकेंबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला. मात्र, लंकेंनी मात्र या भेटीत सूचक विधान करत नगर दक्षिणसाठी आपण तयार असल्याचे दाखवून दिले होते. तसेच 'पवारसाहेब सांगतील तोच आदेश' असे म्हणत आपले इरादेही स्पष्ट केले आहेत.

पुण्यात गुरुवारी (ता.14) राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शरद पवार आणि नीलेश लंके यांची भेट झाली. या भेटीवेळी जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांसह विविध नेतेमंडळी उपस्थित होते. या वेळी राष्ट्रवादीतील बंडावेळी अजित पवारांसोबत गेलेल्या नीलेश लंकेंनी (Nilesh Lanke) आज पवारांची भेट घेतली. हा अजितदादांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. अधिकृतरित्या शरद पवार गटात प्रवेश केला नसला तरी लंकेंनी आपले पत्ते उघड केले आहे.

Nilesh Lanke - Sharad Pawar
Lok Sabha Election 2024 : मायावतींचे काँग्रेसला थेट आव्हान; अमेठी, रायबरेलीबाबत मोठा निर्णय

पुण्यातील शरद पवार गटाच्या कार्यालयात पोहोचले. या वेळी पत्रकार परिषदेत तुमच्या हातात घड्याळ आहे की तुतारी? या प्रश्नावर साहेब सांगतील तो आदेश, असे विधान करत लंकेंनी एकप्रकारे निवडणुकीचे संकेत दिले आहेत.

लंके म्हणाले, लहानपणापासून शरद पवारांच्या नेतृत्वाचा आणि विचारांचा मी चाहता राहिलो आहे. त्यांच्या विचारधारेबरोबरच कायम आहे. आमदारकीसाठी पवारांची अदृश्य ताकद लाभली. साहेब सांगतील तोच आदेश. तेच आमचे सर्वेसर्वा आहेत, असेही ते म्हणाले.

कोरोना काळात शरद पवारांच्या नावाने कोविड सेंटर सुरू केले होते. ज्या काळात कुटुंबातील लोक एकमेकांना विचारत नव्हते. त्या काळात पवारसाहेबांच्या नावाने समाजसेवा करत होतो. त्याच काळात मला जे अनुभव आले. त्याआधारावर ‘मी अनुभवलेला कोविड’ हे पुस्तक लिहिले आहे. त्याचे प्रकाशन शरद पवारांच्या हस्ते व्हावे,अशी माझी इच्छा होती. त्यासाठी या ठिकाणी आलो असल्याचेही आमदार नीलेश लंके म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवारांची विचारधारा कधीही सोडली नव्हती. यापुढेही पवारांच्या विचारधारेनेच काम करणार आहे. माझी विचारधारा आणि पक्ष एकच असून, आजही माझ्या कार्यालयात शरद पवार यांचा फोटो आहे. माझ्या सोशल मीडियाच्या सर्व पोस्ट पाहा. त्यातही कुठे त्यांच्या विरोधात पोस्ट दिसणार नाही. शरद पवारांच्या (Sharad Pawar) मंचावर असताना मी दुसऱ्या मंचावर कसा जाईल? अशी भूमिका मांडतानाच त्यांनी काल, आज आणि उद्याही मी शरद पवारांसोबतच असल्याचे लंकेंनी सांगितले.

पवारांनी दिला शब्द...

शरद पवारांनीही लंकेंच्या (Nilesh Lanke) कामाचे कौतुक करत त्यांना गरज पडल्यास पाहिजे ती मदत करण्याचा शब्द दिला. ते म्हणाले, लंकेंच्या कामाचा झपाटा पाहून पक्षाने त्यांना विधानसभेला संधी दिली. त्यावेळी पारनेरला त्यांच्या प्रचाराला गेलो होतो. विजयी झाल्यानंतर त्यांनी लोकांची कामे प्रामाणिकपणे चालू ठेवली. ते लोकांसाठी काम करणारे नेते आहेत. त्यांचे कार्यालयात स्वागत करतो.

पारनेरमध्ये अनेक समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात. काम करताना भविष्यात काही अडचणी आल्या तर आमची त्यांना साथ असेल, असे पवारांनी स्पष्ट केले. मात्र, लंके लोकसभेत की विधानसभेत दिसतील, या प्रश्नावर पवारांनी लंके हे पारनेरमध्ये दिसतील, असे सांगत थेट उत्तर देणे टाळले.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Nilesh Lanke - Sharad Pawar
Sharad Pawar News : ना प्रवेश, ना तिकीट; पवार-लंके भेटीने उडवली अजितदादा-विखेंची झोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com