kalyan dombvali palika  Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray Shiv Sena protest : महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या खुर्चीवरून महासंग्राम! प्रशासनाची टाळाटाळ भोवणार; उद्धव ठाकरेंच्या सेनेने पुकारला एल्गार, दररोज करणार आंदोलन

KDMC nominated corporators News : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडून निकाल जाहीर होऊन जवळपास दहा महिन्याचा कालावधी लोटला आहे. त्यानंतरही अद्याप स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्यांचा निर्णय झालेला नाही.

Sachin Waghmare

Mumbai News : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक होऊन जवळपास दहा महिने झाले आहेत. पालिकेत एकनाथ शिंदे यांची शिवसेना व भाजपची निर्विवाद सत्ता आहे. मात्र, दुसरीकडे गेल्या अनेक दिवसापासून स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरून प्रशासनाला टाळाटाळ करणे चांगलेच भोवणार आहे. त्यासाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आता चांगलीच आक्रमक झाली आहे. त्यासाठी सेनेने रस्त्यावर उतरून एल्गार पुकारला असून सोमवारपासून दररोज दहा मिनिटे आंदोलनाचा इशारा दिला आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडून निकाल जाहीर होऊन जवळपास दहा महिन्याचा कालावधी लोटला आहे. त्यानंतरही अद्याप स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्यांचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे या नियुक्त्या नेमक्या कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षाने सत्ताधारी पक्ष आणि महापालिका प्रशासनाला आता घेरले आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि शासनाच्या नियमांनुसार स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या होणे अपेक्षित आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महिनाभराने होणाऱ्या पहिल्या महापालिका सभेत नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्याची तरतूद असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने केला आहे. मात्र, तरीही या नियुक्त्यांबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती तातडीने करण्यात यावी, यासाठी महापालिका प्रशासनाकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून (shivsena) वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे. यासाठी अनेक वेळा निवेदने आणि स्मरणपत्रे दिली आहेत. मात्र, त्यानंतरही महापालिका प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही होत नसल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. त्यामुळेचा आता सोमवार पासून दररोज दहा मिनिटे आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे. महापालिका आयुक्त आणि सत्ताधाऱ्यांच्या निषेधार्थ मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर ढोलताशांचा आवाज घुमवून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT