Thane Political News Sarkarnama
मुंबई

Thane Political News : 'अदुबाळ' टिकेचा दिघेंनी घेतला समाचार; म्हणाले, "म्हस्के तर अधुबुद्धीचे.."

Naresh Mhaske Vs Kedar Dighe : "ज्या ठाकरे कुटुंबाच्या जीवावर म्हस्के मोठे झाले..."

Chetan Zadpe

Thane News : युवासेना प्रमुख व शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर कायमच निशाणा साधणाऱ्या शिवसेना शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांच्यावर ठाकरे गटाचे पदाधिकारी केदार दिघे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. म्हस्के यांची बुद्धी अदु झाली आहे. पैसा आणि सत्तेचा माज आल्यावर काही लोक आपल्याला मोठं करणाऱ्यांनाच विसरतात. तशीच अवस्था म्हस्को यांची झाली आहे. त्यांची घमेंड ठाणेकर जनता उतरवेल, अशा शब्दात दिघे यांनी म्हस्केंवर टीका केली. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी टीकेची झोड उठवली. यानंतर बोलताना म्हस्के यांनी आदुबाळ असा उल्लेख करत, आदित्य ठाकरे यांना डिवचले होते. तसेच म्हस्के हे वारंवार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका कायमच म्हस्के हे शिंदेंचे प्रवक्ते म्हणून टिका करत आले. ज्या ठाकरे कुटुंबाच्या जीवावर म्हस्के मोठे झाले त्यांच्या विषयी बोलताना, ज्यांना तारतम्य नाही ते ठाणेकर जनतेचा काय सन्मान करणार? असा सवालही दिघे यांनी उपस्थित केला आहे.

विरोधकांची टीका -

दावोस दौरा हा राज्याच्या औद्योगिक वाढीसाठी की, सरकारच्या पर्यटनासाठी आहे. सरकारी तिजोरीतून 34 कोटी रुपये खर्च करून झालेला दौरा हा अधिकारी, सरकार आणि मुख्यमंत्र्यांची सहल आहे का? की त्यांच्या कुटुंबासाठी पर्यटन आहे, असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला विचारला होता.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, "दावोसचा दौरा हा औद्योगिक वाढीसाठी आहे की सरकारी पर्यटन आहे. यापूर्वीही दावोसचे दौरे झाले आहेत. पण, महाराष्ट्रात आलेले उद्योग आणि गुंतवणूक ही गुजरातला गेली होती. त्यातून महाराष्ट्राला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम सुरू झाले आहे."

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT