Kirtikumar Shinde  Sarkarnama
मुंबई

MNS Vs Shivsena : 'उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मराठी मतं मिळाली नाहीत, असं जे म्हणताय, ते..' ; कीर्तिकुमार शिंदेंचा 'मनसे'ला टोला!

सरकारनामा ब्यूरो

Kirtikumar Shinde on Marathi voting to Thackeray Group : लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून जय पराजयाचे विश्लेषण करण्यात येत आहे अशातच भाजप, शिवसेना शिंदे गट आणि मनसे कडून शिवसेना ठाकरे गटाला मिळालेल्या मतांबाबत वक्तव्य करण्यात आली.

यात एका विशिष्ट समुदायाने शिवसेना ठाकरे गटाला मते दिली आहेत. मराठी माणसांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नाकारल्याचं देखील म्हटले आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते कीर्तिकुमार शिंदे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून मनसेला चांगला टोला लगावला आहे.

या फेसबुक पोस्टमध्ये कीर्तिकुमार शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाला मराठीजनांनी (मग ते कोणत्याही जातीधर्माचे असोत) त्यांना भरभरून मतं दिली. अगदी मुस्लिम- ख्रिश्चन- बौद्ध आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनीही 'मशाल'ला मतदान केलं. "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मराठी मतं मिळाली नाहीत" असं जे म्हणत आहेत, ते स्वतःची फसवणूक आणि मराठीजनांची करमणूक करत आहेत अत्यंत खेदाने म्हणावं लागेल.' असं म्हटलं आहे.

कीर्तिकुमार शिंदे शिंदे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टच्या सुरुवातीस मनसेने नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांना विरोध केला होता तेव्हा आपण/ आम्ही मराठी नव्हतो का? असा सवाल केला आहे.

ते पुढे म्हणातात, 'उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा शिवसेना पक्ष, खासदार आमदार नगरसेवक आणि निशाणी असं सगळं चोरीला गेलेलं असतानाही लोकसभा निवडणुकीच्या परीक्षेत ड्रॉप घेतला नाही. त्यांनी भाजप- नरेंद्र मोदी- अमित शाह(Amit Shah) यांच्याविरोधात रणशिंग फुंकले आणि तब्बल ९ खासदार निवडून आणण्याचा पराक्रम केला, ज्याबद्दल महाराष्ट्रात नाही, अवघ्या देशात त्यांचं कौतुक होत आहे.'

तसेच, 'मराठीजनांनी (मग ते कोणत्याही जातीधर्माचे असोत) त्यांना भरभरून मतं दिली. अगदी मुस्लिम- ख्रिश्चन- बौद्ध आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनीही 'मशाल'ला मतदान केलं. "उद्धवजींच्या शिवसेनेला मराठी मतं मिळाली नाहीत" असं जे म्हणत आहेत, ते स्वतःची फसवणूक आणि मराठीजनांची करमणूक करत आहेत, असं अत्यंत खेदाने म्हणावं लागेल.' असं कीर्तिकुमार शिंदे म्हणाले आहेत.

या पोस्टसोबत त्यांनी अनिल देसाई(Anil desai) यांच्या विजयाच्या मिरवणुकीचा फोटो शेअऱ केला आहे आणि यात जल्लोष करणारे मराठी नाहीत? असा विरोधकांना सवालही केला आहे. तसेच गेली तीन दशकं अनिल देसाई, अरविंद सावंत यांनी स्थानीय लोकाधिकार समिती, भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून मराठीजनांसाठी भरीव काम केलं. त्यांना मराठी मतं मिळाली नाहीत, हे कुणाला पटेल का? असा प्रश्नही कीर्तिकुमार शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT