Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024  Sarkarnama
मुंबई

Lok Sabha Election 2024 : सभेच्या एकाच दिवसानंतर 500 कार्यकर्त्यांचा ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'; बविआत प्रवेश!

संदीप पंडित

Palghar News : पालघर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे गटाकडून भारती कामडी यांना उमेदवारी मिळाली असून, नुकतीच पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे जाहीर सभा झाली. असे असतानाही त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी पक्षाला अखेरचा 'जय महाराष्ट्र' करून बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला. या ठिकाणी महायुतीचा उमेदवार अद्यापही जाहीर झाला नाही. दुसऱ्या बाजूला बहुजन विकास आघाडी ही निवडणुकीत उभी राहणार असल्याने निवडणुकीत रंग भरू लागले आहेत. (Latest Marathi News)

दरम्यान, आज उद्धव ठाकरे गटाला डहाणूत मोठा धक्का बसला असून, त्यांचा तालुका प्रमुख अशोक महादेव भोईर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य आणि अनेक शाखा प्रमुखांनी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला. त्यावेळी नालासोपाराचे आमदार क्षितिज ठाकूर, बोईसरचे आमदार राजेश पाटील, माजी महापौर राजीव पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीने आपला उमेदवार अजून जाहीर केला नसला तरी निवडणुकी पूर्वीच बविआमध्ये इनकमिंग सुरू झाले आहे. आज शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख अशोक महादेव भोईर यांच्या नेतृत्वाखाली 550 कार्यकर्त्यांनी बविआमध्ये प्रवेश केला. यामुळे ठाकरेंना हा जोरदार दणका बसला आहे.

यामध्ये राहुल बोलाडा ग्रामपंचायत सदस्य रानशेत, राहुल ननकु बसवत युवा शाखा अधिकारी,चंदू धांगडा , शाखा प्रमुख घोळ, अजय धडपा ग्रामपंचायत सदस्य, साय, चंदू रघू करमोज, लहानू भोनर शाखा प्रमुख, सुनील गांगेड शाखा प्रमुख निंबापूर, गोपाळ भगत यांचा समावेश आहे. अशोक भोईर तालुका प्रमुख डहाणू यांचा सोबत पालघर विधानसभा क्षेत्रातील बूथ, विभाग, शाखाप्रमुख 500 पदाधिकारी कार्यकर्ते यांचा पक्ष प्रवेश झाला . पक्ष प्रवेश केलेल्यांमध्ये कासा , वेती, वरोती, गंजाड, चारोटी, मुरबाड, निकणे, महालक्ष्मी, धरमपूर, कासा बुद्रुक, वनई, बापू गाव, रायातली, सारणी, रानशेत, निंबापूर, सायवन, उपरले, बांधण या भागातील शिवसैनिकांचा (Shivsena) समावेश आहे.

बविआ पक्ष प्रवेशानंतर अशोक भोईर यांची ब वि आ, पालघर जिल्हा उपाध्यक्षपदी, सुरेश पाडवी यांची पालघर विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी तर अभिजित देसक यांची युवा उपाध्यक्ष पालघर जिल्हा,आदिवासी सेल नेमूणक करण्यात आली आणि आमदार क्षितिज ठाकूर (Kshitij Thakur),आमदार राजेश पाटील, माजी महापौर राजीव पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

(Edited By - Chetan Zadpe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT