Lok Sabha Election 2024 Sarkarnama
मुंबई

Lok Sabha Election 2024 : 'मॅचफिक्सिंग'चा आरोप अन् राऊतांचं आंबेडकरांना सडेतोड प्रत्युत्तर; 'राजकारण आम्हालाही...'

Chetan Zadpe

Mumbai News : महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीची राजकीय मोट ही बांधता बांधता राहिली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपासूनही वंचितने फारकत घेतली. आता दोन्हीकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान, भारतीय जनता पार्टी सोबत महाविकास आघाडीने लोकसभेच्या 20 जागांवर मॅच फिक्सिंग केल्याचा गंभीर आरोप आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. त्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आम्हालाही राजकारण कळतं, असा पलटवार त्यांनी केला. (Latest Marathi News)

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सकाळी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या वेळी राऊत आंबेडकरांवर आरोपा करताना म्हणाले, "प्रकाश आंबेडकर जे म्हणातायेत ज्या जागा फिक्स केल्या आहेत, तिथे भाजपने आपला पराभव मान्य केला आहे. राजकारण आम्हालाही कळतं. प्रकाश आंबेडकर यांनी आमच्या सोबत यावं यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न केले. विनवण्या केल्या. प्रेमाने हात ही जोडले. आपण चळवळीचं नुकसान करू नये, अशी आमची भूमिका आहे. त्यांनी ज्या जागा मागितल्या, त्यांना आम्ही सहा जागा देऊ केल्या.पण त्यांनी त्यांचा एक मार्ग स्वीकारलेला आहे. आम्ही त्यांच्याविषयी कायम आदर भाव ठेऊ, असे राऊत म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रकाश आंबेडकरांचा काय होता आरोप?

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी मॅचफिक्सिंगचा गंभीर आणि खळबजनक आरोप केला आहेत. ते म्हणाले, "मी असे वीस लोकसभा मतदारसंघ सांगू शकतो, जिथे उमेदवारांची फिक्सिंग झाली आहे. बुलडाण्याची जागा जिथे शिवसेनेचा खासदार आहे, त्यांनाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उमेदवारी दिली आहे. त्याच ठिकाणी उद्धव ठाकरेंनी ज्यांना उमेदवारी दिली आहे, ती त्यांच्या पीएला दिली आहे. मग हे मॅच फिक्सिंग आहे की नाही?" असा सवाल आंबेडकरांनी विचारला.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT