Eknath Shinde News Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde News : शिंदे-ठाकरे एकत्र येण्यावर स्वतः मुख्यमंत्री शिंदेच बोलले; 'आम्ही बाळासाहेबांच्या...'

Kalyan Lok Sabha : . मुख्यमंत्री शिंदे यांनी मनसेचे देखील कौतुक केले आहे. मनसेमुळे महायुतीची ताकद वाढल्याचा दावा देखील शिंदेंनी केला आहे.

Roshan More

Lok Sabha Election 2024 : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर सभेत लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचा दावा केला. हे दोघे एकत्र आल्यानंतर ते भाजपसोबत जातील, असे देखील आंबेडकर म्हणाले. हा दावा ठाकरे गटाने फेटाळला होता. मात्र, आता आंबेडकरांच्या या दाव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले आहेत.

'आमचे विचार बाळासाहेबांचे Balasaheb Thackeray आहेत. आमची देशभक्तीचे विचारधारा आहे. त्यांच्या सोबत पाकिस्तानचे बोली बोलणारे बसतात', असा टोला एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंना लगावात एकत्र येण्याचा दावा एक प्रकारे फेटाळून लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या (शुक्रवारी) मुंबईत जाहीर सभा होत आहे या सभेची तयारी करण्याची आवश्यकता नाही. लाखभर लोकं पंतप्रधानांना Narendra Modi ऐकायला येतात, असे देखील शिंदे म्हणाले.

मनसेमुळे ताकद वाढली

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला पाठींबा दिला आहे. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंनी सभा देखील घेतली. कल्याण ग्रामीणमध्ये श्रीकांत शिंदेच्या प्रचारात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत मनसेचे कार्यकर्ते देखील आघाडीवर आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी मनसेचे देखील कौतुक केले आहे. मनसेमुळे महायुतीची ताकद वाढल्याचा दावा देखील शिंदेंनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

श्रीकांत शिंदेंचे कौतुक

मुख्यमंत्री शिंदे यांनी आपले पुत्र श्रीकांत शिंदे यांचे कौतुक केले. कल्याण लोकसभा मतदारसंघ अविकसीत असताना श्रीकांत शिंदेंनी काम केले. दहा वर्षांमध्ये काम केलं. विकसाचे अनेक प्रकल्प आणले. 2014 ते 2019 मध्ये त्यांनी कामाच्या जोरावर स्वतःच नाव कमवलं आहे. एक व्हिजन ठेवून आज त्यांनी आपली ओळखल केली आहे. आज जनता ही खासदार श्रीकांत शिंदे सोबत आहे. ते विक्रमी मतांनी विजयी होतील, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT