Ajit Pawar News: पृथ्वीराज चव्हाणांचे 'ते' विधान अजित पवार गटाच्या जिव्हारी; म्हणाले, 'आता त्यांनी पोपट घेऊन बसावं...!'

Prithviraj Chavan:"अजित पवार गटाला पक्षाला किती जागा मिळणार हे मतदार ठरवतील, 4 जूनला त्याचा निकाल येईल. परंतु, अजित पवारांच्या पाठीशी 40 ते 50 आमदार आहेत. पण चव्हाण तुमच्याबरोबर किती आमदार आहेत?"
Prithviraj Chavan
Prithviraj ChavanSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरु असल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. निवडणुकीचे चार टप्पे पार पडले असून उर्वरित पाचव्या टप्प्यासाठी निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे आता राजकीय नेत्यांकडून आपापल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरु आहे. प्रचारादरम्यान, नेतेमंडळी विरोधकांवर टीका करताना दिसत आहेत.

अशातच आता काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार गटाबाबत केलेल्या वक्तव्यावर पवार गटाच्या नेत्यांनी प्रत्युत्तर देत टीका केली आहे. "पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan:) एकतर पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यासाठी बसावे. निदान पोपटाच्या नादाने तरी काहीजण तुमच्यावर विश्वास ठेवतील" अशी असा टोला अजित पवार गटाने लगावला आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला 15 ते 16 जागा तर महाविकास आघाडीला 30-35 जागा मिळतील, तसेच या निवडणुकीत अजित पवार गटाचा एकही उमेदवार विजयी होणार नाही, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केला होता. त्यांच्या वक्तव्यावर (Ajit Pawar) गटाने प्रत्युत्तर दिलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यासाठी बसावं, निदान पोपटाच्या नादाने तरी काहीजण तुमच्यावर विश्वास ठेवतील, अशी टीका अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उमेश पाटील म्हणाले, राज्यात महायुतीला 15-16 जागा मिळतील आणि आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील अशी भविष्यवाणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. तशीच भविष्यवाणी शरद पवार आणि रोहित पवार यांनीही केली आहे. राज्यात निवडणुकीचे काही टप्पे शिल्लक आहेत, त्यामुळे अशी वक्तव्य करून मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं पाटील म्हणाले. तसंच शरद पवारसाहेबांकडे दीर्घ अनुभव आहे त्यामुळे त्यांच्याबाबत बोलणार नाही.

परंतु पृथ्वीराज चव्हाण हे फक्त राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना टीव्हीवर काही प्रमाणात टीआरपी मिळतो. पण त्यांना राज्यासंदर्भात बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. राजकारणावर भाष्य करण्या एवढी त्यांची उंचीही नाही. ज्या विधानसभा मतदारसंघाचे ते नेतृत्व करतात त्या ठिकाणची त्यांच्याकडे साधी ग्रामपंचायतदेखील नाही हे केवढे मोठे दुर्दैव आहे, असही पाटील म्हणाले.

Prithviraj Chavan
Sanjaykaka Patil : लोकसभेत बेरंग करणार्‍या स्वकीयांचा हिशेब चुकता करणार; संजयकाकांचा कुणा-कुणाकडे रोख?

अजित पवारांच्या पाठीशी 40-50 आमदार

पुढे बोलताना उमेश पाटील म्हणाले, "अजित पवार गटाला पक्षाला किती जागा मिळणार हे मतदार ठरवतील, 4 जूनला त्याचा निकाल येईल. परंतु, अजित पवारांच्या पाठीशी 40 ते 50 आमदार आहेत. पण चव्हाण तुमच्याबरोबर किती आमदार आहेत? काँग्रेसचा एकही आमदार त्यांच्या पाठीशी नाही. त्यामुळे चव्हाणांचे भाष्य माध्यमांनी किती गांभीर्याने घ्यावे याचाही विचार करावा. पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यासाठी बसावं. निदान पोपटाच्या नादाने तरी काहीजण तुमच्यावर विश्वास ठेवतील." असा टोला पाटील यांनी लगावला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भाष्य करण्याच्या भानगडीत पडू नये, आधी आपली सार्वजनिक जीवनातील पत किती आहे? हे तपासून पहावी असा इशारादेखील पाटील यांनी यावेळी दिला.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com