EC orders on Lok Sabha election : सगळ्याच राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरू आहे. विविध पक्षातील इच्छुक उमेदवार लोकसभा-विधानसभेच्या अनुषंगाने जोमाने कामाला लागले आहेत. उमेदवार, कार्यकर्ते आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आणि उपक्रम देखील करत आहेत. मात्र आता निवडणूक आयोगाने याबाबत एक नवी सूचना केली आहे. (Latest Marathi News)
लोकसभेच्या 2024 च्या निवडणुका लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रशासन अतिशय वेगाने कामाला लागले आहे. याबाबत प्रशासकीय स्तरावर आणि पोलिसांच्या विविध बदल्या करण्यात आले आहेत. आता राज्य निवडणूक आयोगाने विभागीय स्तरावर आढावा बैठकी घेण्याचे सुरू केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जे इच्छुक उमेदवार नाम निर्देशन पत्र दाखल करणार असतील त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा एक दिवस आधीच बँकेत स्वतंत्र खाते उघडून निवडणुकीच्या खर्चाचा तपशील त्याद्वारे ठेवावा, असे आदेश काढण्यात आले आहेत.
नाशिकचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे यांनी याबाबत शासकीय परिपत्रक काढले आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने संभाव्य उमेदवारांनी निवडणूक खर्चासाठी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी एक दिवसा अगोदर बँकेत खाते उघडावे असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.