Shrikant Shinde Raju Patil  Sarkarnama
मुंबई

Kalyan Lok Sabha Election 2024 : कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंसाठी मनसे मैदानात, आखली रणनीती

Kalyan lok Sabha Election 2024 : कल्याण लोकसभेतील मनसेच्या मुख्य पदाधिकारी यांची बैठक पार पडली.

शर्मिला वाळुंज

Dombivli : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. महायुतीचे उमेदवार जिंकून आणण्यासाठी लोकसभा समन्वयक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती मनसेकडून करण्यात आली आहे. कल्याण व भिवंडी लोकसभेची धुरा आमदार राजू पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना विजयी करण्यासाठी पाटील हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असून, नुकतीच मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या वेळी आमदार पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना कशा पद्धतीने काम करायचे याच्या सूचना दिल्याचे समजते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर महायुतीचे कल्याण लोकसभेचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ( Shrikant Shinde ) यांना निवडून आण्यासाठी मनसे मैदानात उतरली आहे. आमदार राजू पाटील ( Raju Patil ) यांच्या कार्यालयात गुरुवारी ( 25 एप्रिल ) मनसे विभाग प्रमुख व पदाधिकारी यांची एक बैठक पार पडली. या वेळी महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी कशा पद्धतीने पदाधिकाऱ्यांना काम करायचे आहे. याच्या सूचना आमदार राजू पाटील यांनी त्यांना दिल्या असल्याचे समजते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा का दिला? हेही समजून सांगितले आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांची मत जाणून घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच, मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये काही प्रमाणात भाजप, शिवसेनेविषयी नाराजी असून, त्यांचे काम का करायचे ? अशा शंका पदाधिकाऱ्यांनी या वेळी आमदार पाटील यांच्यासमोर व्यक्त केली. त्यांच्या शंकांचे निरासन करून पुढील लक्ष गाठण्यासाठी काम करण्याच्या सूचना आमदार पाटलांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. पक्षाचा आदेश समजून काम करणार असल्याचे या वेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

त्यामुळे राजकीय पटलावर एकमेकांच्या विरोधात असलेले आणि कट्टर विरोधक मनसे आमदार राजू पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना विजयी करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असल्याचे दिसत आहे. आता खासदार शिंदे यांच्या प्रचारात त्यांचा कसा सहभाग असेल हे पाहावे लागेल.


( Edited By : Akshay Sabale )

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT