Shrikant Shinde News : श्रीकांत शिंदेंचं मोठं विधान; म्हणाले, 'राष्ट्रवादीला भविष्यात...'

Political News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना उभारी देण्याचे आश्वासन देत त्यासोबतच पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सदैव सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
Shrikant shinde news
Shrikant shinde news Sarkarnama
Published on
Updated on

Dombvali News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरात तयारी केली जात आहे. सत्ताधारी व विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपाने राज्यातील वातावरण चांगेलच तापले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा रविवारी डोंबिवलीत पार पडला. महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधत निवडणुकीच्या कामाला लागा, असे आवाहन राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना केले आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp), शिवसेनेसोबत (Shivsena) नव्हती. परंतु आता आपली महायुती झाली आहे. त्यामुळे यावेळी मताधिक्याचा आकडा देखील तेवढाच राहिला पाहिजे. लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीत ही महायुती ही अशीच टिकली पाहिजे. तुम्ही सगळे निश्चित रहा.

कल्याण लोकसभेत आमच्याकडून भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसला ताकद दिली जाईल, अशी ग्वाही देतो असे सांगत शिवसेना खासदार डॉ. शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात पदाधिकारी, कार्यकर्ते यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. (Shrikant Shinde News)

Shrikant shinde news
PM Modi : संघ मुख्यालयात भाजप प्रचारासाठी पहिले योगी, नंतर मोदी !

कल्याण लोकसभेची जागा रेकॉर्डब्रेक मताने जिंकायची आहे. पहिली बैठक जेंव्हा झाली तेव्हा मोठ्या प्रमाणात कल्याण लोकसभेमध्ये निधी आणला पण आमच्याही कार्यकर्त्यांना निधी मिळाला पाहिजे, असे निवेदन दिले होते. त्यावेळी त्यांनी 20 कोटीच्या निधीची मागणी कार्यकर्त्यांसाठी केली होती. मी क्षणाचा ही विलंब न लावता त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांची सही घेऊन दुसऱ्याच दिवशी मी तो निधी त्यांना दिला होता.

आपण या महायुतीमध्ये सहभागी झालेले आहात. भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचे, त्यांना ताकद देण्याचं काम आम्ही करतो. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करतील. कारण ही सुरुवात आहे. हे लोकसभे पुरते मर्यादित नाही. लोकसभा, विधानसभा किंवा महापालिका असेल ही महायुती पुढेही अशीच चालू राहिली पाहिजे, असेही शिंदे म्हणाले.

श्रीकांत शिंदेनी लगावला ठाकरे गटाला टोला

महायुती टिकवून ठेवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. जेणेकरून या जिल्ह्यामध्ये आपली ताकद दिसली पाहिजे. आपण तिघे एकत्र आहोत तर आपल्यासमोर याठिकाणी कोणीही तग धरू शकत नाही, असे म्हणत खासदार शिंदे यांनी महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येईल. त्यासोबतच विरोधक महायुतीसमोर तग धरू शकणार नाही, असे म्हणत श्रीकांत शिंदेनी ठाकरे गटाला टोला लगावला.

(Edited By : Sachin Waghmare)

Shrikant shinde news
Shrikant Shinde News : "वाघ म्हणून फिरणारे अन् मोठ्या वल्गना करणारे आदित्य ठाकरे कुठे आहेत?" श्रीकांत शिंदेंचा सवाल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com