ujjwal nikam varsha gaikwad sarkarnama
मुंबई

Lok Sabha Election 2024 : उत्तर-मध्य मुंबईत तिहेरी लढत, काँग्रेस-भाजपविरोधात 'MIM'चा उमेदवार मैदानात

mumbai north central Constituency : उत्तर-मध्य मुंबईत तिरंगी लढत होईल. याचा फटका वर्षा गायकवाड यांना बसण्याची शक्यता आहे.

Akshay Sabale

उत्तर-मध्य मुंबईतून ( Mumbai North Central Loksabha Constituency ) 'एमआयएम'नं रमजान चौधरी यांना उमेदवार जाहीर केली आहे. रमजान चौधरी यांची काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड आणि भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्याशी लढत होणार आहे. त्यामुळे उत्तर-मध्य मुंबईत तिरंगी लढत होईल. याचा फटका वर्षा गायकवाड यांना बसण्याची शक्यता आहे.

उत्तर-मध्य मुंबईत मतदारसंघातून भाजपनं विद्यमान खासदार पूनम महाजन ( Poonam Mahajan ) यांना उमेदवारी नाकारून प्रख्यात वकील उज्ज्वल निकम ( Ujjwal Nikam ) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर, काँग्रेसकडून वर्षा गायकवाड ( Varsha Gaikwad ) यांना येथून तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम, अशी दुरंगी लढत येथे होणार होती. यातच 'एमआयएम'नं निवडणुकीत ट्विस्ट आणला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रमजान चौधरी यांना 'एमआयएम'नं कडून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाची मते चौधरी यांच्याकडे वळू शकतात. याचा थोडाफार प्रमाणात फटका वर्षा गायकवाड यांना बसू शकतो.

उत्तर-मध्य मुंबईतील उमेदवारीवरून काँघ्रेस आणि भाजपत बरेच दिवस खल सुरू होता. भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांना उमेदवारी नाकारून उज्ज्वल निकम उमेदवारी देण्यात आली आहे. तर, वर्षा गायकवाड दक्षिण-मध्य मुंबईतून लढण्यास इच्छुक होत्या. पण, उत्तर-मध्य मुंबईतून त्यांना उमेदवारी जाहीर झाली.

माजी मंत्री वर्षा गायकवाड या कसलेल्या राजकारणी आहेत. या तुलनेत निकम हे नवखे आहेत. मूळच जळगावचे असलेले निकम यांचा उत्तर-मध्य मुंबईशी फारसा संबंध नाही. निकम हे भाजपचे कधीच सक्रिय कार्यकर्ते नव्हते. तरीही त्यांच्या प्रतिमेचा वापर करून घेण्याचा प्रयत्न भाजपचा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT