Loksabha Election : वंचितने कल्याणचा सुभेदार बदलला, ठाण्यातील उमेदवाराची घोषणा

VBA News : ठाणे लोकसभा मतदारसंघात देखील वंचितने रामराव केंद्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. वंचितकडून उमेदवार जाहीर करताना सर्व जातींना प्रतिनिधीत्व मिळेल याची काळजी घेत असल्याचे दिसून येत आहे.
Vanchit Bahujan Aghadi
Vanchit Bahujan AghadiSarkarnama

Loksabha Election : कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर या उमेदवार आहेत. येथून वंचितकडून मुस्लिम उमेदवार देण्यात आला होता. जलील अहमद यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, वंचिकडून हा उमेदवार बदलण्यात आला आहे. डॉ. मोहम्मद शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Vanchit Bahujan Aghadi
Narendra Modi Interview : '...म्हणून मी उद्धव ठाकरेंचा कायम सन्मान करणारच!'; PM मोदींचं मोठं विधान

ठाणे लोकसभा Thane Loksabha मतदारसंघात देखील वंचितने रामराव केंद्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. वंचितकडून उमेदवार जाहीर करताना सर्व जातींना प्रतिनिधीत्व मिळेल याची काळजी घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उमेदवारी घोषित करताना वंचितकडून VBA त्या उमेदवाराची जात देखील घोषित केली जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वंचितने ठाणे, कल्याणमध्ये उमेदवार दिले असले तरी मुख्यलढत ही शिंदे सेना विरुद्ध ठाकरे सेना यांच्यात होणार आहे. मात्र, वंचितचा उमेदवार जी मते घेईल त्याचा फाटका थेट ठाकरे सेनेला बसण्याचा धोका असल्याचे बोलले जात आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी कल्याण जागेवर श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरेंनी दिलेला उमेदवार शक्तिशाली नसल्याची टीका केली. या जागेवरून शिंदे आणि ठाकरेंमध्ये साटेलोटे असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केली होता.

Vanchit Bahujan Aghadi
Kalyan Politics : आधी 'पॉकेटमनी'वरून डिवचलं; आता राजू पाटील अन् श्रीकांत शिंदेंचे गळ्यात गळे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com