Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Loksabha Election 2024 : भाजप 'मित्र' परिवाराला धक्का देणार? तुम्ही 12 जागांमध्ये भागवा... दिल्लीत मोहोर उमटणार

BJP Politics : अमित शाह दोन दिवस महाराष्ट्रात असूनही महायुतीच्या जागांचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे भाजपने अखेरचे अस्त्र बाहेर काढले आहे. भाजपने 36 जागांवर उमेदवार देण्याचे ठरवले असल्याचे बोलले जाते. त्यावर आजच अंतिम बोलणी दिल्लीत होणार आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Political News :

महायुतीतील भाजपच्या मित्रपक्षांना लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. दोन दिवस अमित शाह राज्यात आहेत. तरीही जागावाटपाचा निर्णय होत नाही. एकनाथ शिंदेंची शिवसेना 22 आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 16 जागांची मागणी करत आहे. म्हणजे 48 पैकी भाजपला केवळ चार जागा उरणार आहेत. त्यामुळे चिडलेल्या भाजप नेतृत्वाने फायनल बैठक दिल्लीला बोलावली असून, त्यासाठी भाजपचे नेते दिल्लीला गेले आहेत. दिल्लीत आज भाजपच्या निवडणूक कोअर समितीची बैठक होणार आहे. त्यात जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जागावाटपाचा तिढा काही केल्या सुटत नाही. त्यामुळे यात अमित शाहांनी (Amit Shah) एन्ट्री केली. अमित शाह दोन दिवस राज्यात होते. त्यांच्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवारांसोबत (Ajit Pawar) बैठका झाल्या. तरीही मार्ग निघाला नाही. अखेर जागावाटपाची सूत्रे हातात घेत भाजपने 36 जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्धार केल्याचे समजते. तसे झाल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादीला केवळ 12 जागांवर समाधान मानावे लागेल.

विशेष म्हणजे शिवसेनेची (Shivsena) 22 जागांची मागणी आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) 16 जागा हव्या आहेत. प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या दोन किंवा तीन जागांवर समाधान मानावे लागेल, अशी चर्चा आहे. तर शिवसेनेला 9 किंवा 10 जागा मिळतील. सध्या शिवसेनेचे 13 खासदार आहेत. तेवढ्या जागांचा त्यांचा कायम आग्रह राहिला आहे. (Loksabha Election)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजप 36 जागा लढवणार याचाच अर्थ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मित्रपक्षांचे पत्ते कट होतील. आता दिल्लीत बैठक असून भाजपचे बडे नेते म्हणजे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर दिल्लीला गेले असल्याची माहिती मिळते. त्यामुळे जागावाटपात भाजपचेच पारडे जड असेल, अशी शक्यता आहे.

(Edited by Avinash Chandane)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT