Loksabha Election : मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाची सभा घेऊन जास्तीत जास्त उमेदवार देण्यापेक्षा अपक्ष म्हणून एकच उमेदवार उभा करण्याचा पर्याय मराठा समाजासमोर ठेवला होता. या विषयी गावागावांत सभा घेऊन 30 मार्चपर्यंत अहवाल देण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी केले होते. आज (शनिवारी) हा अहवाल मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला. हा अहवाल पाहिल्यानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आपली भूमिका जाहीर केली.
मराठा बांधवांनी अपक्ष लढायचे नाही. अपक्ष उमेदवार उभा करायचा नाही, असा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केला. लोकसभेमध्ये ज्याला पाडायचे आहे त्याला पाडा. जो आपल्या बाजूचा वाटतोय त्याला निवडून आणा, पण कोणाच्या प्रचाराला तसेच सभेला जाऊ नका, असे आवाहन जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांनी केले.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, उमेदवार देऊन लोकांपर्यंत पोहाेचण्यास आता पुरेसा वेळ नाही. शिवाय उमेदवार दिल्याने ध्रुवीकरण होऊन दुसऱ्याला मदत होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विधानसभेला अजून सहा महिने वेळ आहे. जर सरकारने सगेसोयऱ्यांवर निर्णय घेतला नाही, तर मराठे विधानसभा लढवतील. 93 विधानसभा मतदारसंघांत मराठ्यांचे वर्चस्व आहे.
सरकार देत नसेल तर मराठा समाज देणारा होईल. सत्ता असो नसो पण मराठ्यांचे आरक्षण (Maratha Reservation) घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. आपण कोणाच्याही प्रचाराला जाणार नाही. आपला कोणाला पाठिंबा नाही, असे मनोज जरांगे यांनी जाहीर केले. जो ओबीसी आरक्षणाच्या बाजूने असेल त्या उमेदवाराला साथ द्या. मी कोणत्याही पक्षाला मतदान करा, असे सांगणार नाही, असेदेखील मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.