S Chokalingam sarkarnama
मुंबई

Loksabha Election 2024 : आचारसंहिता भंगाचे एक लाख गुन्हे, २२०.६५ कोटींचे ड्रग्ज जप्त

सरकारनामा ब्यूरो

Loksabha Election News : लोकसभेच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात ६२.७१ टक्के मतदान झाले असून तिसऱ्या टप्प्यात ११ मतदारसंघांचे मतदान होणार असून येथे दोन कोटी ९ लाख ९२ हजार ६१६ मतदार आहेत. त्यासाठीची सर्व तयारीपूर्ण झाली आहे. सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंत मतदान होणार आहे. आतापर्यंत आचारसंहितेचा भंगप्रकरणी सीआरपीसी अंतर्गत एक लाख ११ हजार जणांवर कारवाई केली असून २२० कोटी ६५ लाखांचे ड्रग्ज जप्त केले आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिली आहे.

चोक्कलिंगम म्हणाले, लोकसभेच्या पहिल्या दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. तसेच चौथ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया होणार आहे. तेथे अर्ज मागे घेण्याची तारीख २९ एप्रिल होती. चौथ्या टप्प्यात दोन कोटी 28 लाख एक हजार 151 मतदार असून एकूण 23 हजार 284 मतदार केंद्रे आहेत.

आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी होत असून आतापर्यंत (सीआरपीसी) अंतर्गत एक लाख ११ हजार ८७८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत रोख रक्कम 49 कोटी 95 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. तसेच 38 कोटी 80 लाख रुपयांची अवैध दारू जप्त केली आहे. 220 कोटी 65 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत.

मतदानाची कमी होणाऱ्या टक्केवारीबाबत ते म्हणाले, मतांची टक्केवारी नोंदविताना १७ अ फॉर्म भरुन घेऊनच नोंदणी केली जात असून पूर्ण मोजून टक्केवारी काढली जाते. दर दोन तासांनी आकडेवारी काढली जाते. संध्याकाळी सहा किंवा रात्री आठ वाजता मतदानाची आकडेवारी सांगताना अंदाजित सांगितली जाते.मतदान पूर्ण झाल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही परिपूर्ण टक्केवारी जाहीर करतो. आम्ही मतदानाचे सर्व आकडेवारी दिली जाते. त्यात काहीच बदल नसतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरे यांच्या प्रचार गीतावर आक्षेप

ठाणे मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्याबाबत साडी वाटपाची तक्रार होत आहे. यावर चोक्कलिंगम म्हणाले, अशी तक्रार आमच्याकडे आलेली नाही. उद्धव ठाकरे यांच्या प्रचार गीतावर आक्षेप घेतले जात आहेत. यावर ते म्हणाले, आम्ही त्याची सर्व पाहाणी केली आहे. आम्ही त्यावर आक्षेप घेतले असून त्यांना पत्रही दिले आहे. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. आमचा आक्षेप बरोबर आहे.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT