Uddhav Thackeray  Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : खासदार शिंदेंच्या मतदारसंघातून ठाकरेंची तोफ धडाडली; म्हणाले, 'कल्याण-डोंबिवली कुणाच्या बापाची...'

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : 'आधी चूक झाली, पण यापुढे कधीही अशी चूक होणार नाही...'

Ganesh Thombare

Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात शनिवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दौरा करीत शाखांना भेट देत शिवसैनिकांशी संवाद साधला.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा हा दौरा महत्त्वाचा असून या माध्यमातून ते आढावा घेत आहेत. कल्याण-डोंबिवलीसह विविध ठिकाणच्या शाखांना भेट देत कल्याण लोकसभा मतदारसंघातून निष्ठावंताला उमेदवारी देणार असल्याचे सूतोवाच करीत मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला.

याबरोबरच 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा भव्यदिव्य सोहळा पार पडणार आहे, तर इकडे उद्धव ठाकरे नाशिकमधील काळाराम मंदिरात जाणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारीच नाशिकमधील काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावरून उद्धव ठाकरे यांनी थेट मोदींना आव्हान देत आपण 22 जानेवारीच्या आधी शिवनेरीला जाणार आहोत, मग मोदीही जातात का ? हे पाहावं लागेल, असा खोचक टोला ठाकरेंनी मोदींना लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'काळाराम मंदिराला भेट देणार असल्याचे मी जाहीर करताच पंतप्रधान मोदींनी मंदिराला भेट देत साफसफाई केली. आता मी जाहीर करतो, की छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जन्मभूमी शिवनेरीचे दर्शन घेणार आहे. जर मोदींना ही माहिती मिळाली तर तेदेखील शिवनेरीला जातात का ? हे पाहावे लागेल,' असं ठाकरे म्हणाले.

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा दौरा

आगामी लोकसभा निवडणुका अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय नेते चांगलेच कामाला लागले आहेत. आता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा दौरा करीत विविध शाखांना भेटी देत शिंदेंना थेट इशाराच दिला.

गद्दार भाजपची धुणीभांडी घासण्यात स्वतःला धन्यता मानत असल्याचा आरोप करीत कल्याण लोकसभेत निष्ठावंताला उमेदवारी देऊन गद्दारी घराणेशाहीला गाडून टाकणार असल्याचं ठाकेरंनी शिंदेंना ठणकावलं.

ठाकरेंनी ललकारलं...

'कल्याण कोणाच्या बापाचं नाही. कल्याणमध्ये फक्त गाडायचं नाही तर पाताळात गाडायचं. या गद्दारांचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. पुन्हा असे गद्दार जन्माला आले नाही पाहिजेत. आधी माझी चूक झाली. मात्र, आता अशी चूक कधीही होणार नाही, यापुढे निष्ठावंतांनाच उमेदवारी दिली जाईल,' असा इशारा उद्धव ठाकरेंनी उल्हासनगरमध्ये बोलताना दिला.

(Edited By- Ganesh Thombare)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT