Loksabha Election : महायुतीत शिवसेना (शिंदे गट) सहा पैकी तीन जागा लढवत आहे. तर तीन जागा भाजप लढवत आहे. शिंदे गटाकडून मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर लढणार आहेत. तर, मुंबई पश्चिम मतदारसंघातून यामिनी जाधव Yamini Jadhav यांना उमेदवारी मिळाली आहे. काँग्रेसमधून उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या संजय निरुपम हे शिंदे गटात दोन दिवसात प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'मुंबईत कोणाचीच विकेट काढायची गरज नाहीये. उद्धव ठाकरे यांची आधीच विकेट गेलीय. ते आधीच क्लीन बोल्ड झालेत.' असा जोरदार प्रहार केला.
मुंबईतील सहा पैकी सहा जागा महायुती जिंकेल. विजयाचा षटकार महायुती मारणार, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री शिंदेंनी Eknath Shinde उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. महायुतीचे मुंबईतील सर्व उमेदवार विजयी होतील त्यामुळे मुंबईत कोणाची विकेट काढायची गरज नाही. उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांची विकेट गेलीये, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मुंबईचा विकास हा 15 ते 20 वर्षापुर्वी व्हायला हवा होता. मात्र तो आत्ता होत आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांनी केलेल्या विकास कामांचा पाढाच वाचून दाखवला. महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत दोन सभा घेणार असल्याचे देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत 13 खासदार आले होते. पण लोकसभा निवडणुकीत महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला 13 पेक्षा कमी जागा मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, महायुतीत अजित पवार गटाला चार जागा, रासपला एक जागा आणि एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला 15 जागा आल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.