Devendra Fadnavis Eknath Shinde Ashish Shelar  sarkarnama
मुंबई

Eknath Shinde News : 'देवेंद्र फडणवीस, आशिष शेलारांना जेलमध्ये टाकण्याचा प्लॅन होता', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खळबळजनक दावा

Devendra Fadnavis : भाजपच्या नेत्यांना जेलमध्ये टाकून 2024 च्या निवडणुकीच्या आधी भाजपमधील काही आमदारदेखील मविआकडून फोडण्यात येणार होते, असा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या मुलाखतीमध्ये केला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Loksabha Election : महाविकास आघाडी सरकार असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जेलमध्ये टाकण्यात येणार होते, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. या दाव्याची पुष्टी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. फक्त देवेंद्र फडणवीसच नाही तर भाजपच्या इतर मोठ्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याचा महाविकास आघाडीचा डाव होता, असा खळबळजनक दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis आशिष शेलार, गिरीश महाजन आणि प्रवीण दरेकरांना खोट्या केसेसमध्ये अडकवून त्यांना अटक करण्याचे षडयंत्र रचल होते, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी एक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे.

भाजपच्या नेत्यांना जेलमध्ये टाकून 2024 च्या निवडणुकीच्या आधी भाजपमधील काही आमदारदेखील मविआकडून फोडण्यात येणार होते, असा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या मुलाखतीमध्ये केला आहे. मविआच्या काळात मला कायमच डावलण्यात आले, असेदेखील शिंदे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरेंकडून मुख्यमंत्री पदाची ऑफर

एकनाथ शिंदे म्हणाले, मी बंड करून सुरतला जात होतो तेव्हा वसईमधील एका चहाच्या टपरीवरून उद्धव ठाकरेंना फोन केला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली. पण वेळ निघून गेलीय असे मी सांगितले. तेव्हा ठाकरे यांनी दिल्लीतील भाजपच्या नेत्यांना फोन केले. मात्र, तोपर्यंत पुलाखालून खूप पाणी गेले होते, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

(Edited By Roshan More)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT