New Delhi News : दिल्लीतील कथित मद्य घोटाळाप्रकरणी तुरुंगात असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal News) यांच्या जामिनाविषयी दिल्ली हायकोर्टात आज मोठी घडामोड घडली. कोर्टासमोर केजरीवालांच्या जामिनासाठी एक याचिका आली होती. या याचिकेवर केजरीवालांकडूच आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर कोर्टानेही याचिकाकर्त्यांना चांगलेच खडसावत याचिका फेटाळली. तसेच याचिकाकर्त्याला 75 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
दिल्ली हायकोर्टात विधी शाखेच्या एका विद्यार्थ्याने केजरीवालांना (Arvind Kejriwal) असाधारण अंतरिम जामीन द्यावा, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने (High Court) याचिकाकर्त्याला चांगलेच धारेवर धरले. तुम्ही संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य आहात का? असे नाही तर मग तुम्हाला वीटोचा अधिकार कुणी दिला?, असा सवाल कोर्टाने केला.
केजरीवालांमार्फत (Delhi Liquor Scam Case) त्यांच्या सर्व कोर्टातील प्रकरणांमध्ये त्यांचे वकील म्हणून राहुल मेहरा काम करत आहेत. त्यांनीही याचिकाकर्त्याला ओळखण्यास नकार दिला. याचिका दाखल करणारा हा व्यक्ती कोण आहे? ही याचिका प्रसिद्धीसाठी असून, लक्ष भटकवणारी आहे, असे मेहरा यांनी कोर्टात सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मेहरा यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने याचिकाकर्त्यांना विचारले की, राहुल मेहरा हे मुख्यमंत्र्यांकडून बाजू मांडत आहेत. ते योग्य पावले उचलत असल्याचे, त्यांचे म्हणणे आहे. त्यांची मदत करणारे तुम्ही कोण आहात, असे कोर्ट म्हणाले. त्यानंतर ही याचिका फेटाळून कोर्टाने 75 हजार रुपयांचा दंड ठोठावला.
दरम्यान, याचिकाकर्त्या विद्यार्थ्याच्या बाजूने कोर्टात म्हणणे मांडणारे वकील म्हणाले, ही याचिका केजरीवालांसाठी करण्यात आलेली नाही. दिल्लीतील कोट्यवधी नागरिकांसाठी ही याचिका आहे. मी केवळ नागरिकांच्या हितासाठी इथपर्यंत आलो आहे, असे वकिलांनी सांगितले. केजरीवालांना अटक होऊन जवळपास महिना होत आला तरी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे दिल्लीकर वाऱ्यावर सोडण्यात आल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.