Eknath Shinde News : "मी रिंगमास्टर, वाघाचे कातडे पांघरणाऱ्या शेळ्या कधीही वाघ होणार नाहीत," मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

Eknath Shinde On Uddhav Thackeray News : "आम्ही केंद्रात, दिल्लीत लोटांगण घालायला जात नाही," असा टोमणा मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना हाणला.
Eknath Shinde
Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics News : श्रीकांत डॉक्टर आहे. पण मी डॉक्टर नसलो, तरी काही सर्जरी केल्या आहेत. काही लोकांचे पट्टे पटापट गायब झाले, काही लोक फास्ट चालायला लागले, तेदेखील गरजेचं होतं, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे (Kalyan Lok Sabha Election 2024) खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा सविस्तर लेखाजोखा असलेल्या 'विकासदशक-दहा वर्षे प्रगतीची, कल्याणच्या समृद्धीची' या कार्य अहवालाच्या प्रकाशन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डोंबिवलीत पार पडला. तेव्हा मुख्यमंत्री शिंदे ( Eknath Shinde ) यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "काही नकली वाघ कल्याण-डोंबिवलीत येऊन पोकळ डरकाळ्या फोडून गेले. पण, एकनाथ शिंदे रिंगमास्टर आहे, तोपर्यंत वाघाचे कातडे पांघरणाऱ्या शेळ्या कधीही वाघ होणार नाहीत. देशात एकच वाघ होऊन गेला, त्याचं नाव बाळासाहेब ठाकरे आहे. त्यामुळे अयोध्येत राम मंदिर झालं. बाळासाहेब असते, तर भरभरून कौतुक केलं असतं."

Eknath Shinde
Uddhav Thackeray News : 'जय भवानी' शब्दावर आक्षेप घेणाऱ्या आयोगाच्या नोटीसीला ठाकरेंकडून केराची टोपली

"केंद्राकडून मदत मागणं किंवा राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्याकडून सहकार्य मागणे याच्यात काय लाज वाटली पाहिजे?" असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. "आम्ही केंद्रात, दिल्लीत लोटांगण घालायला जात नाही, तर राज्याच्या विकासासाठी आवश्यक काम करायला जातो," असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

R.

Eknath Shinde
Uddhav Thackeray News : "आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करून फडणवीस दिल्लीला जाणार होते, पण...", ठाकरेंचा मोठा दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com