Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : एक्झिट पोलचा अंदाज अन् सत्ता स्थापनेचा दावा..., संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

Sanjay Raut on exit poll predictions and government formation in Maharashtra: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (ता.20) मतदान पार पडलं आहे. या निवडणुकीनंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले असून यातून राज्यात महाविकास आघाडी की महायुती सरकार स्थापन करणार? याबाबतचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Jagdish Patil

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (ता.20) मतदान पार पडलं आहे. या निवडणुकीनंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले असून यातून राज्यात महाविकास आघाडी की महायुती (Mahayuti) सरकार स्थापन करणार? याबाबतचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मात्र, शिवसेना (Shivsena) (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एक्झिट पोल हा एक फ्रॉड असल्याचं वक्तव्य केलं आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी एक्झिट पोलच्या अंदाजासह राज्यातील निकाल आणि सत्तास्थापनेच्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, "एक्झिट पोल हा एक फ्रॉड आहे. हरियाणामध्ये काँग्रेसला 60 च्या वर जागा मिळतील असं दाखवलं होतं, पण त्याचं काय झालं आपण पाहिलं आहे. लोकसभेला भाजप 400 पार पण काय झालं? असा सवाल करत ते म्हणाले, "लोकांनी केलेलं मतदान हे गुप्त असतं. काही लोक गोंधळ वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.

मात्र, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) 26 तारखेला संध्याकाळ पर्यंत सत्ता स्थापनेचा दावा करू शकते. मविआच्या 160-165 जागा येतील. त्यामुळे एक्झिट पोलवर कोणीही विश्वास ठेवू नये. आम्ही 23 तारखेला सायंकाळी देखील सत्तेवर दावा करू." तसंच यावेळी ते म्हणाले, सत्तेचा चाव्या येतात की फक्त कुलूप येणार 72 तासाने ठरेल.

प्रचंड पैसे आणि यंत्रणांचा गैर वापर करण्यात आला आहे. पैशापेक्षा महत्वाचा महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान आहे. जनतेने महाराष्ट्रासाठी मतदान केलं आहे. शिवाय महारष्ट्र हवा की अदानी हे आमचं स्पष्ट होतं. ट्रम्प प्रशासनाने अदानीविरुद्ध अटक वॉरंट काढलं आहे. 250 मिलियन डॉलरचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अमित शाह, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे संगमत करून भ्रष्टाचार करुन जागा आणि टेडर बळकविण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातही केला आहे. आम्ही सुद्धा ट्रम्प प्रशासनाप्रमाणे कारवाई करू म्हणून आम्हाला पाडण्यासाठी प्रचंड प्रमाणात पैसा टाकल्याचा आरोप त्यांनी यावेळी अदानी आणि महायुतीवर केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT