Shaina N C | aditya Thackeray sarkarnama
मुंबई

Worli Assembly Constituency: वरळीत आदित्य ठाकरेंच्या विरोधात हायप्रोफाइल चेहरा? भाजपकडून 'या' महिला नेत्याची चर्चा

Roshan More

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघात ठाकरे गटाला पुरेसे लीड मिळाले नाही. त्यामुळे भाजप नेत्यांकडून वरळी विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंना पराभूत करण्याचे आवाहन दिले जात होते. वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे यांना टक्कर देण्यासाठी भाजप हायप्रोफाईल चेहरा उतरवण्याच्या तयारी असल्याच्या चर्चा आहेत.

आदित्य ठाकरेंच्या विरोधात शायना एन. सी यांच्या नावाची चाचपणी भाजपकडून करण्यात येत आहे. शायना एन. सी या भाजपच्या नेत्या आहेत. तसेच व्यावसायाने त्या फॅशन डिझाईनर देखील आहेत. शायना एन. सी यांचे वडील नाना चूडासामा हे मुंबई शहराचे माजी शेरीफ होते.

वरळी विधानसभा मतदारसंघात बीडीडी चाळी, डिलाईल रोड बीआयटी चाळी, जिजामाता नगर झोपडपट्टी, वरळी कोळीवाडा तसेच वरळी सी फेस विभागातील अनेक हायराईज टॅावर ही उच्चभ्रू नागरिकांचे निवास्थान देखील आहेत.

शायना एन सी यांना उमेदवारी मिळाली तर वरळी मतदारसंघात हायप्रोफाइल लढत होण्याची शक्यता आहे.

मनसेही मैदानात

आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळी मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील उमेदवार उतवणार आहे. मनसेकडून विधानसभा स्वबळावर लढण्यात येणार असून वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसेकडून संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता आहे.

लोकसभेला वरळीतून कितीचे लीड?

दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये वरळी विधानसभेचा समावेश होतो. लोकसभेला शिवसेनेकडून (यूबीटी) अरविंद सावंत यांच्या विरोधात शिवसेनेच्या (शिंदे गट) यामिनी जाधव उमेदवार होत्या. या निवडणुकीत अरविंद सावंत विजयी झाले. त्यांना वरळी विधानसभा मतदारसंघातू 64 हजार 844 मतं मिळाली तर, यामिनी जाधव यांना 58 हजार 129 मतं मिळाली. अरविंद सावंत यांना वरळी मतदारसंघातून अवघ्या 6500 मतांचे मताधिक्य मिळाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT