Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिपदाचा तिढा पुन्हा दिल्ली दरबारी! मोदी-शहांच्या भेटीनंतर मोठा निर्णय होणार?

Mahayuti Cabinet Expansion Disputes : मोठी खाती मिळण्यासाठी शिवसेना आग्रही आहे. गृहमंत्रिपदावर शिवसेनेचा डोळा आहे. पण या खात्यावर भाजपचा आपला दावा कायम आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरुन अनेकजण गॅसवर असल्याचे चित्र आहे. विशेषत: शिवसेनेतील नेत्यांमध्ये अद्यापही अस्वस्थता कायम आहे.

Mangesh Mahale

Mumbai News : महाराष्ट्रात फडणवीस सरकार स्थापन होऊन आठवडा होत आहे. पण अद्याप खातेवाटप झालेले नाही. येत्या 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे समजते. पण गृहमंत्रिपदासह आणखी काही महत्वाच्या पदावरुन भाजप आणि शिवसेना यांच्यातील पेच अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे दोन्ही पक्षातील नेते आपल्याला कुठले मंत्रिपद मिळेल याबाबत अस्वस्थ आहेत.

मोठी खाती मिळण्यासाठी शिवसेना आग्रही आहे. गृहमंत्रिपदावर शिवसेनेचा डोळा आहे. पण या खात्यावर भाजपचा आपला दावा कायम आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरुन अनेकजण गॅसवर असल्याचे चित्र आहे. विशेषत: शिवसेनेतील नेत्यांमध्ये अद्यापही अस्वस्थता कायम आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार आज दिल्लीला जाणार आहेत.

गृहमंत्री पदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये अजूनही घोडं अडल्याची माहिती आहे. काल (मंगळवारी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यात होते, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईत होते. मंत्रिमंडळ विस्ताराला दोन दिवस शिल्लक असताना गृहमंत्रीपदाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली पण निर्णय झाला नसल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.गृहमंत्रिपदावर शिवसेनेने आपला दावा कायम ठेवला आहे. भाजप शिवसेनेला गृहमंत्रिपद देण्यास तयार नसल्याचे समजते.

राज्याचे तीन दिवसाचे विशेष अधिवेशन नुकतेच झाले. अधिवेशन संपल्यानंतर महायुतीच्या तीनही प्रमुख नेत्यांची बैठकत होऊन खाते वाटपाचा तिढा सुटेल, अशी आशा होती, मात्र तसे झाले नाही. विशेष अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बैठक झाली नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. भाजप मंत्र्यांच्या यादीला पक्ष नेतृत्वाची मंजुरी घेण्यासाठी दोघे जाणार असल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT