Eknath Shinde-Ajit Pawar-Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Mahayuti Cabinet Final : महायुतीच्या मंत्र्यांची यादी फायनल; दिल्लीत भाजप हायकमांड मोहोर उमटवणार

State Government : महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला 21, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 12 आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला नऊ ते दहा मंत्रिपदे मिळणार आहेत.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 14 December : महायुती सरकारचा बहुप्रतिक्षीत मंत्रिमंडळ विस्तार येत्या रविवारी (ता. 15 डिसेंबर) नागपूरमध्ये होणार आहे. महायुतीमधील तीनही पक्षांचे मंत्रीही निश्चित झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या (Mahayuti) मंत्र्यांची फायनल यादी दिल्लीत भाजप हायकमांडकडे पाठविली आहे. दिल्लीत भाजप श्रेष्ठींकडून हिरवा कंदील आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस हे यादीतील भाजप आमदारांना फोन करणार आहेत.

महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला 21, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 12 आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला नऊ ते दहा मंत्रिपदे मिळणार आहेत. यादीतील आमदारांना नागपुरात उद्या शपथ दिली जाणार आहे. त्यानंतर 16 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) होणार आहे.

महायुतीमध्ये गृह, अर्थ ही खाती भाजपकडेच राहणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यावर अधिकृत माहिती महायुतीकडून अजूनही देण्यात आलेली नाही. मात्र, भाजपकडे असलेले संख्याबळ पाहता महत्वाची खाती ही भाजपकडेच राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. पण, शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदासाठी अडून बसले होते. मात्र भाजपने गृहमंत्रिपदाऐवजी नगरविकास हे खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे असणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखाते असणार की नाही, याचीही चर्चा सुरू आहे. मात्र, अजित पवार हे अर्थखाते सहजासहजी सोडतील, अशी परिस्थिती नाही, त्यामुळे अर्थखाते अजित पवार यांच्याकडेच राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, मागील वेळी मिळालेली खाती राष्ट्रवादीला मिळतील का, हा खरा प्रश्न आहे.

तीनही पक्षातील तब्बल 35 आमदारांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत हायकमांडकडे पाठविली आहे. भाजपचे पक्षश्रेष्ठी त्यावर मंजुरीची मोहोर उमटवतील. दुपारनंतर मुख्यमंत्री फडणवीस यादीतील भाजपच्या आमदारांना, उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादीच्या आमदारांना, तर एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांना फोन करून माहिती देणार आहेत. त्यामुळे संभाव्य मंत्रिपदाची यादी कधी जाहीर होणार याची उत्सुकता इच्छुकांबरोबरच राजकीय वर्तुळातही आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT