Cabinet Expansion : एकनाथ शिंदेंचा रूसवा कायम? बावनकुळेंच्या दोन भेटीनंतर फडणवीस पुन्हा चर्चा करणार

Mahayuti Leader : चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये तब्बल 40 मिनिटे बैठक झाली. त्यातून एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाली आहे की संभाव्य मंत्रिमंडळाच्या यादीवर चर्चा करण्यात आली, याची उत्सुकता वाढली आहे.
Eknath Shinde-Chandrashekhar Bawankule-Devendra Fadnavis
Eknath Shinde-Chandrashekhar Bawankule-Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai,13 December : मंत्रिमंडळ विस्ताराला अवघ्या एका दिवसाचा कालावधी उरला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजूनही महायुतीच्या नेत्यांसोबत बैठकीत सामील होताना दिसत नाहीत. शिंदे यांचा हट्ट कोणत्या मंत्रिपदासाठी हे जगजाहीर आहे. पण भाजपनेही ताणून धरल्याने मंत्रिपदाची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. एकनाथ शिंदे यांची नाराजी दू करण्याची जबाबदारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर आहे. मात्र, त्यांच्या दोन भेटीनंतर शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळेच आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मैदानात उतरले आहेत. फडणवीस आणि शिंदे यांची सागर बंगल्यावर लवकरच भेट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्रिपद नाकारल्यापासून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे महायुतीत नाराज दिसत आहेत. मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडताना त्यांनी गृहमंत्रिपदाचा आग्रह धरला होता. मात्र, भाजपने तो आग्रह अव्हेरला, त्यामुळे शिंदे यांच्यापुढे पेच निर्माण झाला होता. मात्र, दिल्लीश्वरांनी सांगताच ते उपमुख्यमंत्री होण्यासाठी राजी झाले. मात्र, त्यांची नाराजी अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे भाजप नेत्यांकडून त्यांच्या भेटी घेतल्या जात असल्याचे दिसून येत आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या चोवीस तासांत एकनाथ शिंदे यांची दुसऱ्यांदा भेट घेतली आहे. तत्पूर्वी बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर या भेटीगाठींना मोठे महत्व आहे. फडणवीस-पवार यांच्या भेटीनंतर बावनकुळे यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन शिंदे यांची भेट घेतली आहे.

Eknath Shinde-Chandrashekhar Bawankule-Devendra Fadnavis
Cabinet Expansion : एकनाथ शिंदेंना मिळणार आवडीचे खाते; मात्र, महत्वाच्या मंत्रिपदावर सोडावे लागणार पाणी

चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये तब्बल ४० मिनिटे बैठक झाली. त्यातून एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाली आहे की संभाव्य मंत्रिमंडळाच्या यादीवर चर्चा करण्यात आली, याची उत्सुकता वाढली आहे. आता प्रत्यक्षात रविवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीला कोणती खाती मिळतात, हे समजणार आहे.

Eknath Shinde-Chandrashekhar Bawankule-Devendra Fadnavis
Ambadas Danve : अंबादास दानवेंचा शिंदे गटावर गंभीर आरोप; थेट ऑडिओ-व्हिडिओ बाहेर काढण्याची धमकी

दरम्यान, बावनकुळे यांच्या भेटीनंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहेत. या दोन्ही नेत्यांची भेट फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर होणार आहे. बावनकुळे यांच्या गेल्या २४ तासांतील दुसऱ्या भेटीनंतरही फडणवीस हे शिंदेंशी कोणत्या विषयावर भेटत आहेत, याची उत्सुकता वाढली आहे. खरंच शिंदे नाराज आहे की मंत्रिमंडळाची अंतिम यादीवर काम केले जात आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com