राहुल क्षीरसागर
Thane Shivsena News : अनंत तरे यांना उपनेतेपद देऊन आनंद दिघेंच्या डोक्यावर बसवण्यात आले, असा आरोप एकनाथ शिंदेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केला होता. आनंद दिघेंचे फोटो लावू नका, असे फर्मान संजय राऊतांनी काढल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्यामुळे ठाण्याचे राजकारण पेटले आहे. म्हस्के यांनी केलेल्या आरोपाला तरे कुटंबातील माजी नगरसेविका आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपजिल्हा महिला संघटक महेश्वरी तरे यांनी जोरदार उत्तर दिले आहे.
त्या म्हणाल्या, 'दिवंगत अनंत तरे यांच्या नावावर घाणेरडे राजकारण करू नका. त्यांच्या योगदानाचा अपमान आम्ही सहन करणार नाही. साडेचार वर्ष अनंत तरे यांचे नाव कुणालाच आठवले नाही आणि आता अचानक त्यांची आठवण काढली जातेय. तुम्ही आमच्या दादांचे नाव घेतले तर खबरदार. आम्ही कोळी महासंघाला आवर घातला आहे, पण लोकांचा रोष वाढत चालला आहे.'
'अनंत तरे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः उपनेतेपद दिले होते.तेव्हा म्हस्के कुठे होते? त्या काळात अनंत तरे यांनी तीन वेळा महापौरपद भूषवले, जे गिनीज रेकॉर्ड आहे. त्यांनी शिवसेनेला तन-मन-धनाने योगदान दिले. ठाण्याच्या राजकारणात सत्ता आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यावेळी म्हस्के ठाण्याच्या गल्लीबोळात फिरत होता.', असे देखील त्या म्हणाल्या.
'तुम्ही खासदार आहात, प्रतिष्ठित पदावर आहात. त्यामुळे बोलताना जबाबदारीने बोला, गलिच्छ राजकारण करू नका. जर पुरावे असतील तर समोर मांडा, हवेत बाण सोडू नका.', असे आवाहन देखील महेश्वरी तरे यांनी म्हस्केंना केले.
'ठाण्याचे राजकारण म्हणजे समाजकारण आहे. आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी या ठिकाणी शिस्त लावली. त्यांच्या श्रेयावर कोणी डाका टाकू नये,” असे मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते अनिश गाढवे यांनी व्यक्त केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.