मुंबई

Manoj Jarange Patil : मुख्यमंत्री शिंदेंची धाकधूक वाढणार? मनोज जरांगेंची तोफ कल्याणमध्ये धडाडणार

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Political News : मराठा आरक्षणासाठी सरकारला सळो की पळो करून सोडणाऱ्या मनोज जरांगे पाटलांचा दुसऱ्या टप्प्यातील दौरा सुरू झाला आहे. या दौऱ्यात जरांगे पाटलांची तोफ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी कल्याण पूर्वेतील पोटे मैदानात मनोज जरांगेंची जाहीर सभा होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या होमग्राउंडवर जरांगे पाटील काय बोलणार, याकडे लक्ष आहे. (Latest Political News)

मराठा समाजाच्या आरक्षणचा लढा देणाऱ्या जरांगे पाटलांनी रुग्णालयातून बाहेर पडताच राज्यभर दौरा करण्याचे जाहीर केले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून त्यांना कल्याणमध्ये आणण्याचे प्रयत्न मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून सुरू होते. त्यानुसार कल्याणमधील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने या दौऱ्याचे आयोजन केले आहे. आता मनोज जरांगे पाटील सोमवारी कल्याणमध्ये येणार आहेत. मराठा समाजाच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्यानंतर त्यांची जाहीर सभा होणार आहे.

सभेला होणारी गर्दी लक्षात घेता मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांसोबत जागांची चाचपणी सुरू केली आहे. कल्याण पूर्वेकडे शंभर फुटी रोड, खडेगोळवली येथील १०० फुटी रोड, एपीएमसी मार्केट, सुभाष मैदान, फडके मैदान, कल्याण पूर्वेकडील पोटे मैदान या जागांची चाचपणी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात पहिल्यांदाच येणारे जरांगे पाटील काय भूमिका मांडणार, याची उत्सुकता लागली आहे.

दरम्यान, जरांगे यांच्या सभेनिमित्त कल्याणमधील विरोधक असलेले शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, आम आदमी पार्टी या पक्षांतील सर्व मराठा नेते एकत्र आल्याचे दिसून येत आहे. या सभेबाबत बोलताना मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी अरविंद मोरे म्हणाले, २० नोव्हेंबर रोजी जरांगे पाटलांची सभा होणार आहे. या सभेसाठी कोळशेवाडीमधील पोटे मैदान जवळपास निश्चित करण्यात आले आहे. संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मराठा बांधव या सभेसाठी येणार असल्याचेही मोरेंनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT