Advay Hiray Arrested : शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांना भोपाळमध्ये अटक

Nashik NDCC Bank case : जिल्हा बँक कर्ज प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने केली कारवाई
Dr. Adway Hiray and Dada Bhuse
Dr. Adway Hiray and Dada BhuseSarkarnama
Published on
Updated on

Malegaon Latest News : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रेणूका सुत गिरणी संस्थेसाठी घेतलेले कर्ज थकविल्याप्रकरणी शिवसेना उपनेते डॉ. अद्वय हिरे यांना भोपाळमधून अटक करण्यात आली. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात ते पोलिसांना सापडत नव्हते. ऐन दिवाळीत पोलिसांनी ही अटकेची कारवाई केल्याने तो चर्चेचा विषय होता. (Hiray criticized previously Guardian Minister Dada Bhuse for missusing power)

यासंदर्भात नाशिक (Nashik) पोलिसांनी (Police) आज सकाळी शिवसेना (Shivsena) उपनेते डॉ. हिरे यांना भोपाळ येथून ताब्यात घेतले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. पलिसांच्या या कारवाईला राजकीय वास येत असल्याची हिरे समर्थकांची तक्रार आहे.

Dr. Adway Hiray and Dada Bhuse
Manoj Jarange Patil News : शेणीत येथे १०१ एकरवर रेकॉर्डब्रेक सभेचा निर्धार!

मालेगाव येथील रेणूका सहकारी सूत गिरणीसाठी जिल्हा बँकेकडून मोठे कर्ज मंजूर झाले होते. हिरे बँकेचे संचालक असतानाच हे कर्ज देण्यात आले. मात्र या कर्जाची परतफेड न झाल्याने जिल्हा बँकेने याबाबत वारंवार पाठपुरावा केला होता. त्यात काहीही प्रतिसाद नसल्याने मालेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता, अशी माहिती मालेगाव पोलिसांनी दिली.

हा गुन्हा नाशिकच्या अर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. त्यात हिरे बेपत्ता असल्याने पोलिसांना सापडत नव्हते. त्यांनी याबाबत उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले होते. हिरे यांच्या शोधासाठी पोलिसांनी पथक तयार केले होते. या पथकाने मोबाईल ट्रेस करून त्यांना भोपाळ येथून अटक केली.

दरम्यान शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री दादा भुसे आणि शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांच्यातील तीव्र राजकीय स्पर्धा, आरोप प्रत्यारोपातून प्रशासनाने सुडाच्या भावनेने व राजकीय दबावातून ही कारवाई केल्याचा आरोप हिरे समर्थकांनी केला आहे.

दरम्यान, मे महिन्यात रियाज अली खान आणि मनजीत शिंदे यांनी शैक्षणिक संस्थेत नोकरीचे आश्वासन देऊन आपली १८ लाखांची फसवणूक केल्याची तक्रार नाशिक पोलिसांत केली होती. यामध्ये शिक्षक नेमणुकीसाठी आपल्याकडून पैसे घेण्यात आल्याच्या गुन्ह्याखाली हिरे यासह माजी मंत्री पुष्पाताई हिरे, माजी मंत्री प्रशांत हिरे तसेच अन्य ६६ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यात अद्वय हिरे यांना अटकपूर्व जामीन देखील मंजूर झाला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dr. Adway Hiray and Dada Bhuse
Marathwada Water Issue: न्यायालयाच्या निकालापर्यंत नाशिकहून पाणी न सोडण्याचा निर्धार!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com