State Backward Classes Commission Sarkarnama
मुंबई

Backward Classes Commission : राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष राजीनामा देणार?; दोन मंत्र्यांच्या दबावाची चर्चा

Maratha Reservation : राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामात राज्य सरकारकडून हस्तक्षेप होत आहे. अमूक एका माहितीचाच आग्रह सरकारकडून केला जात आहे.

Vijaykumar Dudhale

Mumbai News : राज्य मागासवर्ग आयोगाच्या चार सदस्यांनी राजीनामा देऊन काही दिवस होत नाहीत, तोच आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती आनंद निरगुडे हेही राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती आहे. आयोगाच्या कामकाजासंदर्भात बनविण्यात आलेल्या ‘व्हॉट्‌स ॲप’ ग्रुपवर निरगुडे यांनी तशी भावना बोलून दाखवली आहे. (Discuss of State Backward Classes Commission's Chairman will resign?)

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली क्युरेटिव्ह पिटीशन त्या पैकी आहे. त्याबाबतची सुनावणी उद्या (ता. ६ डिसेंबर) होणार आहे. त्या सुनावणीला अधिक बळ यावं, यासाठी आयोगाकडून काही माहिती सरकारला अपेक्षित आहे. मात्र, हे सर्व घाईने होत असल्याचं आयोगाचं म्हणणं आहे. राज्य सरकारची गरज पूर्ण करण्यासाठी आयोगावर दबाव टाकला जात आहे. आमूकच माहिती द्यावी, तीही घाईघाईने मागितली जात आहे, असा आरोप आयोगाचे सदस्य आणि अध्यक्षांकडून करण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामात राज्य सरकारकडून हस्तक्षेप होत आहे. अमूक एका माहितीचाच आग्रह सरकारकडून केला जात आहे. मात्र, आयोग स्वायत्त असून सर्व्हेक्षणातून पुढे आलेली माहितीच आम्ही सरकारला देऊ शकतो. त्याव्यरिक्ति माहिती द्यावी, असे सांगितले जात असेल तर काम करणे अवघड आहे, असेही आयोगाचे सदस्य आणि अध्यक्षांचं म्हणणं आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामकाजात दोन मंत्री आणि एका न्यायमूर्तीचा हस्तक्षेप असल्याची तक्रार आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या क्युरेटिव्ह पिटिशनसाठी सहाय्यक ठरेल अशी माहिती आयोगाकडून सरकारला अपेक्षित आहे. मात्र, अध्यक्ष आणि सदस्य हे सर्व्हेक्षणाची माहिती देण्यावर ठाम आहेत. आयोग स्वायत्त असून खरं आहे, तेच आम्ही तुम्हाला देऊ शकतो, असे सदस्यांचं म्हणणं आहे. मात्र, आयोगाच्या सदस्यांवर दबाव टाकला जात असल्यामुळे काही सदस्यांनी राजीनामा देणे पसंत केले आहे.

यापूर्वी आयोगाच्या चार सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यात बालाजी किल्लारीकर, प्रा. डॉ. संजीव सोनावणे, लक्ष्मण माने, लक्ष्मण हाके यांचा समावेश आहे. आयेागातील चार सदस्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता अध्यक्षांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली आहे, त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT