Bidri Sugar Factory Result : दोन मंत्री, दोन खासदार, सात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या ‘बिद्री’ची मतमोजणी सुरू

Kolhapur News : बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक निकालाकडे राधानगरी, कागल, गारगोटी, करवीर तालुक्याची मिनी विधानसभा म्हणून पाहिले जात आहे.
Bidri Sugar Factory election
Bidri Sugar Factory electionSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कागल तालुक्यातील श्री. दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या (बिद्री) निवडणुकीच्या मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. सायंकाळी पाचपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे. बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत दोन कॅबिनेट मंत्री, दोन खासदार, दोन आमदार, पाच माजी आमदार, दोन जिल्हाध्यक्ष, गोकुळचे अध्यक्ष हे एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. त्यामुळे निकालाबाबत अवघ्या कोल्हापूर जिल्ह्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (Bidri Sugar Factory election counting begins)

बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या (Bidri Sugar Factory) निवडणुकीत ५६ हजार ९१ मतदारांपैकी ४९ हजार ९४० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता १७३ केंद्रावर शांततेत मतदान पार पडले होते. दोन्ही आघाडीचे ५० उमेदवार, शेतकरी संघटनेचे दोन आणि चार अपक्ष अशा ५६ उमेदवारांचे भवितव्य थोड्याच वेळात समजणार आहे. मतमोजणीला १२० टेबलवर सुरूवात झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bidri Sugar Factory election
Laxman Hake News : मागासवर्ग आयोगाच्या कामात हस्तक्षेप वाढल्याने राजीनामा दिला; हाकेंनी सांगितले कारण...

दरम्यान, बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक निकालाकडे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, कागल, गारगोटी, करवीर तालुक्याची मिनी विधानसभा म्हणून पाहिले जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत ताकद पणाला लावली होती. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील नेत्यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे, त्यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे.

कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष के. पी. पाटील आणि आमदार प्रकाश आबिटकर यांच्यात मागील दोन महिन्यांपासून कारखाना निवडणुकीवरून जोरदार खडाजंगी सुरू होती. कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण हे नात्यागोत्याचे आणि भावकीचे राहिले आहे. त्यात के. पी. पाटील यांचे मेहुणे ए. वाय. पाटील यांनी पाटलांचे विरोधक आमदार प्रकाश आबिटकर यांना साथ दिली आहे, त्यामुळे सभासद कुणाच्या बाजून कल देतात, हे पहावे लागणार आहे.

Bidri Sugar Factory election
Katipally VenkataRamana Reddy : चाळीस वर्षांनी केसीआरचा पराभव करणारे; जायंट किलर कटीपल्ली व्यंकटरमण रेड्डी

श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडी विरुद्ध राजर्षी शाहू परिवर्तन विकास आघाडी असा दुरंगी सामना बिद्री साखर कारखाच्या निवडणुकीत रंगला होता. बिद्री कारखान्याच्या निकालातून विधानसभेचे चित्रही बऱ्यापैकी स्पष्ट होणार आहे, त्यामुळे विधानसभा इच्छुकांनी या कारखान्याच्या निवडणुकीत मोठी शक्ती पणाला लावली होती. कारखान्याच्या निवडणुकीत कोण वरचढ ठरणार आणि कोणाचा करेक्ट कार्यक्रम होणार, याचं उत्तरही लवकरच मिळणार आहे.

Bidri Sugar Factory election
Solapur Politics : नागेश वल्याळ अन्‌ सहकारी चंद्रकांतदादांचे घरवापसीचे निमंत्रण स्वीकारणार का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com