New Delhi : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच तापला आहे. जरांगेंनी सरकारला दिलेली 24 डिसेंबरची मुदत जवळ येत असतानाच दुसरीकडे त्यांनी राज्यात सभांचा धडाका लावला आहे. तसेच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही मराठा आरक्षणाचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान, आता मराठा आरक्षणासंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे.
सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल करण्यात आलेल्या मराठा आरक्षणासाठीच्या क्युरेटिव्ह याचिकेवर वर शुक्रवारी (ता. 15 डिसेंबर) निर्णय लागण्याची शक्यता आहे.या मागचं महत्त्वाचं कारण म्हणजे शुक्रवारी ख्रिसमसच्या सुट्ट्यांपूर्वी न्यायालयाच्या कामकाजाचा अखेरचा दिवस आहे.तसेच क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी घेणाऱ्यांपैकी न्यायमूर्ती संजय किशन कौल यांचा निवृत्तीपूर्वी कामकाजाचाही 15 डिसेंबर हा शेवटचा दिवस आहे. यामुळे क्युरेटिव्ह पिटीशनवर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जयश्री पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. मराठा आरक्षण वैध की अवैध यावर क्युरेटिव्ह याचिका दाखल केली गेली आहे. जर न्यायालयाने ही याचिका फेटाळली तर महायुती सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.या निर्णयामुळे मराठा आरक्षणासाठी पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागू शकते. तसेच मागासवर्गीय आयोगाचा सुधारित अहवाल सादर करावा लागू शकतो.आणि याच निर्णयामुळे मराठा समाज पुन्हा पेटून उठण्याची देखील शक्यता आहे. (Maratha Reservation)
मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश संजय किशन कौल यांच्या पीठासनासमोर ही याचिका दाखल केला आहे. आणि ते 25 डिसेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. यात न्यायाधीश निवृत्त होण्याआधी निकाल देण्याची सर्वसाधारण परंपरा आहे.त्यामुळे उद्याच मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह याचिकेवर निकाल येण्याची शक्यता आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मराठा आरक्षणच्या क्युरेटिव्ह याचिकेवर (Curative Petition) तीन प्रकारे न्यायालय निर्णय देऊ शकते. त्यात ही याचिका फेटाळण्यात येऊ शकते.क्युरेटिव्ह याचिकेमध्ये सुप्रीम कोर्ट नोटीस काढू शकते.त्यात या याचिकेतील प्रतिवादी जयश्री पाटील यांना भूमिका मांडण्याचे निर्देश देण्याची शक्यता आहे.आणि यातील तिसरा निकाल म्हणजे ओपन कोर्टात सुनावणी करू असं म्हणत कोर्ट सुनावणीची तारीख जाहीर करु शकते.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.