Eknath Shinde On Milind Deora Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde On Milind Deora : मिलिंद देवरा तुमच्याकडे येणार का? शिंदे म्हणाले, 'मला माहिती नाही..'

Eknath Shinde On Milind Deora : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी ही लढाई पाहायला मिळाली होती.

Chetan Zadpe

Mumbai News : काँग्रेसचे नेते माजी खासदार मिलिंद देवरा यांचा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे. मी विकासाच्या मार्गावर असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांचा शिंदे पक्षप्रवेश होण्यची केवळ औपचारिकता राहिल्याचे बोलले जात आहे. याबाबत आता मुख्यमंत्री एखनाथ शिंदे यांनीही याबाबत सूचक प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देवरा यांच्या पक्षप्रवेशाबाबत विचारले असता शिंदे म्हणाले, अशी माहिती मी ऐकतोय. अद्याप मला याबाबत माहिती नाही. मात्र, मिलिंद देवरांचा शिवसेनेत प्रवेश होणार असेल, तर त्यांचा मी देवरा यांचं स्वागत करतो. पण याबाबत मला आता माहि मी त्याची माहिती नंतर सांगतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यानंतर ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर देवरा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मी विकासाच्या मार्गावर जात आहे, अशी सूचक प्रतिक्रिया दिली.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी ही लढाई पाहायला मिळाली होती. महाविकास आघाडीतून या जागेचे दावेदार ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आहेत, यामुळे देवरा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळली होती. यामुळे आता देवरा शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याचे निश्चित आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT