Purvesh Sarnaik sarkarnama
मुंबई

Women Reservation : आरक्षणाचा मंत्र्याच्या मुलाला फटका; उमेदवारीवरून पेच, दिग्गजांचा पत्ताही कट!

Thane Mahapalika Pratap Sarnaik Sarvesh Sarnaik : महापालिकेच्या आरक्षणामुळे मंत्र्याच्या सुपुत्राची कोंडी झाली आहे. जेथून निवडणूक लढण्याची तयार करत होते तेथील आरक्षण महिलेसाठी जाहीर झाले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Thane Mahapalika : महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेचे आरक्षण जाहीर झाले आहे. आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवार जोमाने कामाला लागले आहेत. मात्र, काही ठिकाणी अपेक्षित सोडत नसल्याने नवी समीकरणे पाहण्यास मिळू शकतात. ठाणे महापालिकेच्या आरक्षण सोडतीमध्ये प्रभाक क्रमांक 14 अ महिलेसाठी राखीव झाला आहे.

या आरक्षणाचा फटका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांना बसला आहे. ते प्रभाग क्रमांक 14 अ मधून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. आता आरक्षणामुळे या प्रभागात उमेदवारी निवडीवरून पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

महिला आरक्षणामुळे अनेक दिग्गजांची विकेट पडली आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांसह राष्ट्रवादी, भाजप, शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे येथून तयारी करणारे नेते आपल्या घरातील महिला किंवा आरक्षणानुसा त्या प्रवर्गातील महिला उमेदवारांचा शोध घेण्याची शक्यता आहे. चा सदस्यीय प्रभाग रचनेत 131 जागांमधील 66 जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.

'या' दिग्गजांना बसला धक्का

शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका साधला जोशी यांचा प्रभाग अनुसूचित जमातीमधील पुरुषासाठी राखीव झाला आहे. तर, भाजपच्या माजी नगरसेविका कविता यांना देखील आरक्षणाचा फटका बसला असून त्यांचा प्रभाग मागासवर्गीय नागरिकांसाठी आरक्षीत झाला आहे. माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांचा प्रभाग आरक्षीत झाल्याने त्यांना दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढवावी लागणार आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय शानू पठाण यांचा वाॅर्ड देखील महिलेसाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे तेथून ते आपल्या मुलीला निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT