Eknath Shinde and Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Dispute in BJP-Shivsena: युतीत पुन्हा मिठाचा खडा नको; सेना-भाजपने घेतला मोठा निर्णय

Shambhuraj Desai Big Statement : मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषद घेत दिली मोठी माहिती

सरकारनामा ब्यूरो

Political News: 'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे' अशा आशयाची एक जाहिरात मंगळवारी सर्वच वृत्तपत्रांमध्ये झळकली. या जाहिरातीमध्ये देशात 'मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे' असा उल्लेख करण्यात आलेला होता. या जाहिरातीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं. त्यानंतर शिवसेना नेत्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवरच यापुढे आता युतीमध्ये कोणताही वाद होऊ नये, म्हणून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

आता युतीमध्ये समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. ते आज माध्यमांशी बोलत होते. जाहिरातीच्या मुद्यानंतर आता यापुढे भाजप-शिवसेनेमध्ये (शिंदे गट) कुठलाही वाद होऊ नये, यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

शंभूराज देसाई म्हणाले, "आता तो विषय संपवू आणि 2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागू. आमची भूमिका आम्ही कालच देवेंद्र फडणवीस यांना सांगितली आहे. सामंजस्याच्या भूमिकेतून पुढे जाण्याचा प्रयत्न करू. पुन्हा वाद नको म्हणून समन्वय समिती स्थापन करणार आहोत. दोन्ही पक्षातील वरिष्ठांची समन्वय समिती करू", अशी माहिती शंभूराज देसाई यांनी दिली.

जाहिरातीत नेमकं काय म्हटलं होतं?

'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे' अशा आशयाची एक जाहिरात मंगळवारी वृत्तपत्रांमध्ये झळकली. या जाहिरातीमध्ये देशात 'मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे' असा उल्लेख करण्यात आलेला होता.

एका संस्थेने केलेल्या सर्व्हेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाला राज्यातील जनतेने अधिक पसंती दिल्याचं म्हटलं होतं. याच सर्व्हेचा आधार घेत शिवसेनेने वृत्तपत्रांमध्ये ही जाहिरात दिली. या जाहिरातीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांना राज्यातील जनतेनी अधिक पसंती दिल्याचा दावा करण्यात आला. याच जाहिरातीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं.

दरम्यान, जाहिरातीच्या मुद्यांवरून महाराष्ट्रात भाजप-शिंदे युतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा रंगली. त्यानंतर भाजप नेत्यांनीही नाराजी व्यक्त केल्याची चर्चा होती. अखेर यानंतर शिवसेना नेत्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तसेच मंत्री शंभूराज देसाई यांनी जाहिरातीशी शिवसेना पक्षाशी कसलाही संबंध नाही, कोणीतरी शुभचिंतकानं ही जाहिरात दिली असल्याचं मंगळवारी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं.

(Edited By- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT