Uddhav Thackeray News Sarkarnama
मुंबई

MLC Elections News : 'शिक्षक-पदवीदधर'साठी ठाकरे गटाकडून 'या' नावांची चर्चा; कुणाला मिळणार तिकीट?

Chetan Zadpe

Mumbai News : राज्यातील विधानपरिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी 10 जूनला मतदान होणार आहे. विधानपरिषदेच्या रिक्त होणाऱ्या या जागापैकी मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे. तर आतापासूनच या जागांवर कुणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरु झाली आहे. (Latest Marathi News)

मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक व मुंबई शिक्षक मतदारसंघात होत असलेल्या या निवडणुकीत कुणाची वर्णी लागणार या बाबत उत्सुकता कायम आहे. या जागांसाठी भाजप (Bjp), शिवसेना ठाकरे गट (Shivsena) व काँग्रेसने (Congress) तयारी केली आहे. त्यामुळे कॊणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबई आणि कोकण पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीचे उमेदवार लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब, वरून सरदेसाई यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. तर मुंबई शिक्षक मतदारसंघात ज. मो.अभ्यंकर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात किशोर जैन यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त आहेत.

मुंबई पदवीधर मतदारसंघांमध्ये विलास पोतनीस हे आमदार म्हणून कार्यरत आहेत. मात्र आता त्यांच्या ऐवजी विधानपरिषदेचे आमदार अनिल परब यांना मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार म्हणून उतरवले जाऊ शकते. अनिल परब यांचा 27 जुलै रोजी विधान परिषदेच्या आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण होत आहे आणि त्यामुळेच मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी अनिल परब यांचं नाव उमेदवारीसाठी अधिक चर्चेत आहे.

ठाकरे गटाचे युवा नेते सचिव वरुण सरदेसाई यांच्या नावाचा सुद्धा विचार मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी केला जात आहे. तर मुंबई (Mumbai) शिक्षक मतदार संघासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज मो अभ्यंकर यांचं नाव उमेदवारीसाठी जवळपास निश्चित मानला जात आहे. तर कोकण पदवीधर मतदारसंघातून रायगडचे सहसंपर्कप्रमुख आणि अनंत गीते यांचे विश्वासू किशोर जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर नाशिक शिक्षक मतदारसंघात सध्या आमदार असलेले किशोर दराडे हे जरी शिवसेना ठाकरे गटात सोबत असले तरी दुसऱ्या नावांचीही शिवसेना ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT