Yashwant Killedar
Yashwant Killedar Sarkarnama
मुंबई

MNS News: कर्नाटक निकालावरुन मनसे नेत्याचा फडणवीस,ठाकरेंवर निशाणा; '' महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करणाऱ्या...''

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं जादुई बहमुताचा आकडा लीलयापार करत दिमाखदार विजय मिळवत भाजपचा दणदणीत पराभव केला. मोदी शाह यांच्या झंझावती प्रचार, स्टार प्रचारकांची फौज मैदानात उतरवूनही भाजपला कर्नाटकात अवघ्या ६५ जागा जिंकता आल्या. याच पार्श्वभूमीवर भाजप तसेच मोदी सरकारला विरोधी पक्षाकडून लक्ष्य करण्यात येत आहे. याचदरम्यान, मनसे नेत्यानं देखील कर्नाटक निवडणुकीच्या निकालाचा संदर्भ देत भाजपसह ठाकरे गटावरही निशाणा साधला आहे.

मनसेचे उपाध्य यशवंत किल्लेदार(Yashwant Killedar) यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारणाऱ्या काँग्रेसचं अभिनंदन केलंय तर भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यशवंत किल्लेदार यांनी काँग्रेसचं अभिनंदन केलंय. तर भाजपवर सडकून टीका केली आहे. महत्वाची बाब म्हणजे तर किल्लेदार यांनी आपल्या ट्विटमध्ये “महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करणाऱ्या प्रत्येक राजकीय घडामोडींमध्ये हात असलेल्या देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) तसेच उद्धव ठाकरे यांची कूटनीती महाराष्ट्र पाहत आहे. लवकरच जनतेची काठी चालेल आणि कर्नाटकप्रमाणेच महाराष्ट्राची जनता ह्या निगरगट्ट राजकारण्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”असा हल्लाबोल केला आहे.

ट्विटमध्ये काय म्हटलंय ?

यशवंत किल्लेदार यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. आज कर्नाटकमध्ये काँग्रेसने यश मिळवत बहुमताचा आकडा गाठला आहे. प्रथम त्यासाठी काँग्रेसचं मन:पूर्वक अभिनंदन! कर्नाटकात 2018 साली झालेल्या निवडणुकांच्या जनतेने कोणालाच स्पष्ट बहुमत दिले नव्हते. मात्र काँग्रेस(Congress) आणि जेडीएसने युती करुन बसवलेलं सरकार भाजपने 2019 मध्ये ऑपरेशन ‘ब्लू लोटस’ राबवत पाडलं आणि स्वत:चं सरकार बसवलं.

पण तिथल्या जनतेचा हा घोडेबाजार लक्षात राहिला आणि जनतेने भाजपला चांगलाच धडा शिकवला अशी टीका यशवंत किल्लेदार यांनी केली आहे. तसेच कर्नाटकच्या विजयासाठी काँग्रेसचं अभिनंदन आणि जनमताचा कौल झुगारुन घोडेबाजार करणाऱ्यांसाठी बोध! असा टोलाही भाजपला लगावला आहे.

भाजपच्या विरुद्ध जनतेच्या मनात रोष...

कर्नाटक निवडणुकांचे हाती आलेलेल कल पाहता, भाजपच्या विरुद्ध जनतेच्या मनात रोष दिसून येत आहे. भाजपने खेळलेल्या अशा फोडा-फोडीच्या खेळीमुळे त्यांच्या मतदार संकेतही प्रमाणात घट दिसून येत आहे. महाराष्ट्रातही 2019 ला झालेल्या निवडणुकीत जनतेने शिवसेना-भाजप(BJP) युतीला कौल दिला होता. मात्र, त्यांच्या अंतर्गत वादामुळे आधी राष्ट्रवादी-भाजप त्यानंतर महाविकास आघाडी आणि आता पुन्हा भाजपच्या घोडेबाजारामुळे भाजप-शिवसेना (शिंदे गट) हे सरकार उदयास आलं असं किल्लेदार म्हणाले.

प्रस्थापित राजकारण्यांचा जनतेच्या मनाविरोधात चाललेला हा राजकारणाचा खेळ जनता पाहत आहे. येणाऱ्या काळात आगामी निवडणुकांमध्ये कर्नाटकत प्रमाणेच महाराष्ट्रातील ही जनता राजकारणाचा आणि जनतेच्या मनाचा खेळ करणाऱ्या राजकारण्यांना आणि प्रस्थापित राजकीय पक्षांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही यशवंत किल्लेदार यांनी दिला आहे .

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT