Sanjana Jadhav News : '' 2024 ला जनतेच्या मनातील आमदार मीच...!'' ; संजना जाधवांनी रणशिंग फुंकलं

Kannad Politics : माझ्यासारखा संघर्ष दुश्मनाच्याही वाट्याला येऊ नये.
Sanjana Jadhav News
Sanjana Jadhav News Sarkarnama
Published on
Updated on

Kannad : ''माझ्या घरात मंत्रीपद, आमदारकी सर्व काही असताना माझ्या वाट्याला संघर्ष आला. तो संघर्ष दुष्मनाच्याही वाट्याला येऊ नये. मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत जनतेच्या मनातील विधानसभा सदस्य(MLA) मीच आहे'' असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य संजना जाधव यांनी आज कन्नडमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळावा व नवनिर्वाचित बाजार समिती संचालक सत्कार सोहळ्यात केले.

संजना जाधव व माजी आमदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने बाजार समिती(Bazar Samiti) निवडणुकीत बहुमताने विजय संपादित केला.या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार सोहळा संजनाताई जाधव यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी डीडी लॉन्स येथे आयोजित केला.

Sanjana Jadhav News
Karnataka Assembly Elections Result 2023 Live : कर्नाटकात खर्गेंचा करिश्मा; नेतृत्वावर शिक्कामोर्तब; विजयानंतर परसेप्शन बदलणार

यावेळी संजना जाधव(Sanjana Jadhav) म्हणाल्या, कन्नड तालुक्यात विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मतदारसंघांमध्ये अठरा वर्षापासून मी विविध आघाड्यांवर संघर्ष करत आहे. हा संघर्ष दुश्मनाच्याही वाट्याला येऊ नये. माझ्या घरात सर्व सत्ता केंद्र असताना मी सुखाने घरात राहू शकते.मात्र कार्यकर्त्यांना मी वाऱ्यावर सोडू शकत नाही. त्यामुळे जनतेच्या प्रश्नासाठी मी संघर्ष करत आहे. कार्यकर्ते हेच माझे कुटुंब बनले आहे असे भावोद्गारही त्यांनी काढले.

Sanjana Jadhav News
Karnataka Election Result : मागील वेळापेक्षा 56 जागा अधिक; काँग्रेसचा कसा चढत गेला आलेख?

याप्रसंगी सर्वाधिक मतांनी निवडून आलेले बाजार समिती संचालक साईनाथ आल्हाड म्हणाले, संजना जाधव यांचे नेतृत्व संघर्षशील आहेच, पण त्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडत नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक विश्वास निर्माण झाला आहे. त्यांच्यामुळेच हे यश मिळाले आहे.प्रास्ताविक सिद्धेश्वर झाल्टे यांनी केले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com