Karnataka Election Result : मागील वेळापेक्षा 56 जागा अधिक; काँग्रेसचा कसा चढत गेला आलेख?

Karnataka Assembly Election Result 2023 : काँग्रेसच्या मतांमध्ये भरमसाठ वाढ...
Karnataka Election Result :
Karnataka Election Result : Sarkarnama

Karnataka Election Result 2023 : कर्नाटकातील विधानसभेचा निकाल आता जवळपास स्पष्ट झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेसला दणदणीत विजय मिळाला आहे. काँग्रेसला 136 तर भाजपला 65 जागा मिळाल्या आहेत. तर जेडीएसला फक्त 19 जागांवर समाधान मानावे लागले. याशिवाय 4 जागा अपक्ष व इतरांच्या पदरात पडल्या आहेत.

या निवडणुकांमुळे काँग्रेसची ताकद आणखी वाढली आहे. याशिवाय काँग्रेसच्या मतांमध्येही दणदणीत वाढ झाली आहे. सन 2018 मध्ये काँग्रेसच्या मतांची टक्केवारी सुमारे 38 टक्के होती, या निवडणुकीत यावेळी 43 टक्के मते मिळाली. काँग्रेसपेक्षा अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासाठी ही निवडणूक अधिक महत्त्वाची होती. याचे कारण कर्नाटक हे खर्गे यांचे गृहराज्य आहे आणि गृहराज्य असल्याने निवडणुकीत पक्षाचा विजय अधिक महत्त्वाचा ठरतो.

Karnataka Election Result :
Karnataka Result : कर्नाटकच्या शेवटच्या जागेसाठी काटे की टक्कर; काँग्रेस उमेदवार निसटत्या २९४ मतांनी आघाडीवर !

मतांची टक्केवारी :

या निवडणुकीत काँग्रेसला 43 टक्के, भाजपला 35.90 टक्के तर जेडीएसला 13.30 टक्के मते मिळाली आहेत .

फायदा नुकसान कुणाल किती?

2018 मध्ये भाजपला 104 जागा मिळाल्या होत्या, तर 2013 च्या निवडणुकीत भाजपला 64 जागा मिळाल्या होत्या. याशिवाय 2023 मध्ये भाजपला केवळ 65 जागा मिळाल्या आहेत. गेल्या वेळेच्या (2018) तुलनेत भाजपच्या 39 जागा कमी झाल्या आहेत. दुसरीकडे, यंदाच्या निवडणुकीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास काँग्रेसला 136 जागा मिळाल्या आहेत, म्हणजे गेल्या वेळेच्या (2018) तुलनेत 58 जागांचा फायदा आहे.

जेडीएसचे फॅक्टर :

जर आपण जेडीएस विचार केला तर 2018 मध्ये जेडीएसला 37 जागा मिळाल्या होत्या आणि 18.30 % इतकी मते होती. तर यावेळी म्हणजे 2023 च्या विधानसभा निवडणुकीत जेडीएसला 19 जागा मिळाल्या आहेत. आणि 13.30 % मते मिळाली आहेत. म्हणजेच जेडीएसच्या जागांसोबतच मोठ्या प्रमाणात मतांमध्ये घट झाली आहे.

Karnataka Election Result :
Karnataka Election Result: कर्नाटकात काँग्रेसचा ऐतिहासिक विजय; राहुल गांधींचं अभिनंदन करत ठाकरे म्हणाले, ही 2024 च्या विजयाची नांदी

विधानसभेत काय बदल होणार?

या निकालानंतर कर्नाटक विधानसभेची स्थिती किती बदलणार आहे? सध्या भाजप+मित्रपक्षांकडे 117, काँग्रेस 69, जेडीएसकडे 29 आणि इतरांकडे 3 जागा आहेत. याशिवाय सध्या 6 जागा रिक्त आहेत. यासोबतच, या निकालांनंतर भाजपचला 65 जागा मिळाल्या आहेत. याशिवाय काँग्रेसला 136, जेडीएसला 19 आणि इतरांना 4 जागा मिळाल्या आहेत.

Karnataka Election Result :
Karnataka Election Result : राष्ट्रीय दर्जा मिळविण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न; मिळाली इतकी मते...

सिद्धरामय्या यांच्या मुलाचे वक्तव्य :

डीके शिवकुमार की सिद्धरामय्या? कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार यावर सस्पेन्स कायम आहे. दरम्यान, सिद्धरामय्या यांचे पुत्र यतिंद्र सिद्धरामय्या यांचे वक्तव्य आले आहे. ते म्हणाले, 'माझे वडील पुढचे मुख्यमंत्री झाले तर मला खूप आनंद होईल. केवळ मुलगा म्हणून नाही तर एक नागरिक म्हणूनही मला चांगले वाटेल.

प्रियांका गांधींनी विजयाबद्दल अभिनंदन केले :

काँग्रेसच्या या विजयाबद्दल प्रियंका गांधी यांनी कर्नाटकातील जनतेचे आभार मानले आहेत, त्या म्हणाल्या, 'लोकांना मूळ प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी राजकारण हवे आहे. लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी राजकारणात जागा नाही, हे हिमाचल आणि कर्नाटकने दाखवून दिले. भ्रष्टाचार, बेरोजगारी, महागाई या मुद्द्यांवर लोकांनी मतदान केल्याचे प्रियंका गांधी म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com