Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

MNS NEWS : लोकसभेसाठी मास्टर प्लॅन, मनसे भाकरी फिरवणार!

Roshan More

Mumbai : सर्वच राजकीय पक्षांच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. मात्र, चर्चांपासून लांब असलेल्या मनसेकडून लोकसभेसाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असल्याची माहिती आहे. ज्या पदाधिकारी आणि विभाग अध्यक्षांनी काम केले नाही तिथं भाकरी भिरवली जाणार आहे. त्या जागी नवीन चेहरे देण्यात येतील. शिवाय लोकसभेसाठी पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे.

मनसेकडून लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि विभाग अध्यक्ष यांना मतदारसंघात मोठे कार्यक्रम घेण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. तसेच काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना प्राधान्य देऊन काम न करणाऱ्यांना बाजूला करण्यात येणार आहे. शिवाय मुंबईसाठी देखील रणनीती आखण्यात येत आहे.

लोकसभेसाठी मुंबईतील पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करून नवीन जबाबदारी देणार असल्याचे समजते. पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करून त्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येईल. मनसेकडून लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांनी तयारीला सुरुवात देखील केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुणे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी वसंत मोरे यांनी इच्छा व्यक्त केली होती. तर पक्षाने संधी दिली तर लोकसभा निवडणूक लढवू, असे मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुण्यातील जागेसाठी चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान, अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले तर साईनाथ बाबर यांना पाठिंबा देणार, असेही वसंत मोरेंनी स्पष्ट केले आहे.

मनसेकडून मुंबईत लोकसभेच्या तयारीबाबत बैठका घेतल्या जात आहेत. पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरुर तसेच मावळ लोकसभेची जागा लढविण्याबाबत चाचपणी केली जात आहे. या मतदारसंघातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची जबाबदारी देखील निश्चित केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT