Mohan Patil  sarkarnama
मुंबई

Mohan Patil Arrest : अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षाला अटक, आर्थिक घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई

Midday Meal Scheme Corruption : मोहन पाटील यांना अभिनव शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षपदी नेमण्यात आले होते. मात्र, त्यांनी माध्यान्ह भोजन योजनेसाठी राज्य सरकारकडून येणाऱ्या निधीमध्ये गैरव्यवहार केला होता.

Roshan More

Mira Bhayandar Political News : राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) मीरा-भाईंदर जिल्हाध्यक्ष मोहन पाटील यांना अटक आज (शुक्रवारी) पहाटे आर्थिक गु्न्हे शाखेने अटक केली. भाईंदर पूर्वेच्या अभिनव शिक्षण संस्थेत भ्रष्टाचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मोहन पाटील (Mohan Patil) यांचा अटकपूर्व जामीन 24 फेब्रुवारीला फेटाळला होता. तेव्हापासून मोहन पाटील फरार होते.

मोहन पाटील यांना अभिनव शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षपदी नेमण्यात आले होते. मात्र, त्यांनी माध्यान्ह भोजन योजनेसाठी राज्य सरकारकडून येणाऱ्या निधीमध्ये गैरव्यवहार (corruption) केला होता. फक्त मध्यान्ह भोजनचे नाही संस्थेमध्ये आर्थिक अपहार, काॅम्युटरच्या निधीमध्येदेखील कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप मोहन पाटील यांच्यावर होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा)

न्यायलयामध्ये सुरू असलेल्या या प्रकरणात तब्बल 32 तारखांनंतर फेब्रुवारी महिन्यात मोहन पाटील यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला होता. मात्र, जामीन फेटाळल्यानंतर मोहन पाटील फरार होता. मोहन पाटील हा राष्ट्रवादी NCP (अजित पवार गट) विद्यमान जिल्हाध्यक्ष आहेत.

मीरा-भाईंदरच्या राजकारणात मोहन पाटील हे महापालिकेने नगरसेवक असताना त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनदेखील काम पाहिले होते. आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्यावर कारवाई करत आज त्यांना अटक केली. अभिनव संस्थेसोबतच नवीन संस्थेकडून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाटील यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून आज (शुक्रवारी) ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT