Mohit Kamboj-Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Kamboj Offer To Raut : मोहित कंबोज यांची संजय राऊतांना ऑफर; ‘दुबईला जातोय, चला पार्टी करूया...’

Vijaykumar Dudhale

Mumbai News : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मकाऊ येथील फोटो आणि व्हिडिओ शेअर करणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांना मोहित कंबोज यांनी ऑफर दिली आहे. ‘मी दोन दिवसांसाठी सुटीला दुबाईला जात आहे. चला आपण पार्टी करूया,’ असे आवाहन त्यांनी राऊत यांना केले आहे. (Mohit Kamboj's offer to Sanjay Raut)

संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचे मकाऊ येथे कासिनोमधील फोटो ट्विट केला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांनी मकाऊमधील एक व्हिडिओही शेअर केला आहे. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. भाजप आणि शिवसेनेत राजकीय वार रंगले होते. दोन्ही बाजूकडून आरोप-प्रत्यारोप आजही होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यापार्श्वभूमीवर भाजपचे मोहित कंबोज यांनी आज एक व्हिडिओ ट्विट करत संजय राऊत यांना दुबईला सुटीला येण्याची ऑफर दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, नमस्कार राऊत साहेब, मी दोन दिवसांच्या सुटीसाठी दुबईला निघालो आहे. आपल्याला लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याची प्रचंड आवड आहे. कोण कुठे जात आहे, कोणं कुठून येत आहे. कोण कसिनो खेळत आहे, कोण जेवण करतंय. कोण पबमध्ये आहे, कोन डिस्कोमध्ये आहे.

माझं असं मत आहे की, तुम्हाला पार्टीची खूप आवड आहे. तुम्ही रात्री लपून छपून एकटे एकटे ‘आरे’मध्ये जाता, आणखी कुठे कुठे जात असता. आपल्या परदेशी मित्रांसोबत तुम्ही पार्ट्यां करता. कधी कधी ‘ग्रॅंड हयात’ हॉटेलमध्येही जाता, आणखी कुठे कुठे तुम्ही जात असाल, असा सवालही कंबोज यांनी उपस्थित केला आहे.

ते म्हणाले की, मी शनिवार, रविवार दुबाईला जात आहे. तुम्हीही या. एकत्र पार्टी करूया. तुम्ही येणार नसाल तर तुमची जी डिटेक्टिव्ह एजन्सी आहे, त्या एजन्सीला काही फोटो, व्हिडिओ मिळाले तर सोशल मीडियावर शेअर जरूर करा. माझी तुम्हाला विनंती आहे की, आपल्या डोक्यावर उपचारही करून घ्यावेत. ते आपल्यासाठी आवश्यक आहे.

चला जरा घराच्या बाहेर पडून देशात, परदेशांत फिरूया. लोकांशी भेटूया. अरे हं, तुम्हाला तर ‘लूक आऊट’ची नोटीस असेल. आपण तर ईडीचे आरोपी आहात. त्यामुळे तुमच्याशिवाय आम्ही दुबाईला फिरून पार्टी करून येतो. त्यानंतर सोमवारी आपण भेटूयात, असे आव्हानही कंबोज यांनी राऊत यांना दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT