महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSC Bank) घोटाळ्याप्रकरणी मोठी घडामोड समोर आली आहे. सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं क्लोजर रिपोर्ट दाखल केला असून, सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य सहकारी बँकेनं कर्जाच्या स्वरूपात साखर कारखान्यांना कोट्यवधी रुपये दिले. तसेच, कारखाने 'एनपीए' झाल्यानंतर ते नाममात्र किमतीत बँकेतील संचालकांच्या निकटवर्तींना विकल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे बँकेला हजारो कोटींचं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याच प्रकरणात आता आर्थिक गुन्हे शाखेनं क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. त्यानुसार सुनेत्रा पवारांसह (Sunetra Pawar) बारामती अॅग्रो लिमिटेड कन्नड सहकारी साखर कारखान्याप्रकरणी रोहित पवार आणि प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. आतापर्यंत 1343.41 कोटी रुपयांची वसुली करण्यात आल्याचा दावा क्लोजर रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात दाखल करण्यात आलेल्या क्लोजर रिपोर्टचा तपशील आता उघड झाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
ईडीनं दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं 2010 मधील लिलावात जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना किंमत कमी दाखवत आणि विकून टाकलेला होता. तत्कालीन बँकेच्या संचालक मंडळावर अजित पवार हेही होते. हा कारखाना गुरू गणेश कमोडिटी सर्व्हिसेस प्रा.लि.ने विकत घेऊन तो तत्काळ जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा.लि. ला भाडेतत्त्वावर दिला.
गुरू कमोडिटी सर्व्हिसेस प्रा.लि. ही कंपनी डमी असल्याचं ईडीकडून सांगण्यात आले. स्पार्कलिंग सॉइल प्रा.लि. कंपनीकडे जरंडेश्वर कारखान्याचे सर्वाधिक शेअर्स होते. ही कंपनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या कंपनीशी संबंधित असल्याचं ईडी चौकशीतून समोर आलं होतं.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.