Eknath Shinde-Ganesh Naik  Sarkarnama
मुंबई

Ganesh Naik : मुकेश अंबानींमुळे पालकमंत्रिपद मिळाले; शिवसेना नेत्याच्या विधानावर गणेश नाईक म्हणाले,‘ठीक आहे, मी नाकारत नाही...’

Shivsena Vs BJP : शिवसेनेचे नेते विजय चौघुले यांनी ‘मुकेश अंबानी जर मध्ये पडले नसते, तर गणेश नाईक यांचीच लॉटरी लागली नसती,’ असा टोला पालकमंत्रिपदावरून लगावला.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 17 August : महायुतीमध्ये सध्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये सध्या जोरदार वाक्‌युद्ध सुरू आहे. हे वाक्‌युद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातच रंगले आहे. भाजपचे वरिष्ठ मंत्री गणेश नाईक यांनी पालघरमधील एका कार्यक्रमात एकनाथ शिंदेंबाबत बोलताना लॉटरी लागली, असे वक्तव्य केले होते. त्याला शिवसेनेचे विजय चौघुले यांनी मुकेश अंबानींमुळे गणेश नाईकांना पालकमंत्रिपद मिळाले, असा दावा केला आहे. त्यावर नाईक यांनी ठीक आहे, सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळाले, असे उत्तर दिले आहे, त्यामुळे ठाण्यात सध्या सत्तेतील दोन पक्षांत वार-प्रतिवार सुरू आहेत.

भाजपचे नेते तथा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी गेल्या काही महिन्यांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी गणेश नाईक यांनी ठाण्यात जाऊन जनता दरबार घेतला होता. त्यावेळी शिवसेना आणि भाजपमध्ये चकमक झाली होती. त्यानंतर नाईकांनी पुन्हा एकदा शिंदेंना शिंगावर घेतले आहे.

पालघरमधील एका कार्यक्रमात बोलताना वनमंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना लॉटरी लागली, ही आनंदाची गोष्ट आहे. पण कमावलेले टिकवता आलं पाहिजे. किती कमावले यापेक्षा, ते कसं कमावलं आणि कसं टिकवलं, याकडे जनसामन्यांची नजर असते,असे विधान केले होते. त्यामुळे खवळलेल्या शिवसेनेकडून भाजपचे नाईक यांच्यावर प्रतिहल्ला करण्यात येत आहे.

खासदार नरेश म्हस्के यांनी साठी बुद्धी नाठी. गणेश नाईक यांचं वय झालं आहे, त्यामुळे कदाचित वयोवृद्ध झाल्यामुळे ते अशी वक्तव्ये करीत असावेत. एकनाथ शिंदे हे बाहेर पडले, त्यामुळे ही सत्ता मिळाली, त्यामुळे लॉटरी कोणाला लागली, हे तुम्ही समजून घ्या’ असा इशारा दिला आहे. तसेच, शिवसेनेचे नेते विजय चौघुले यांनी ‘मुकेश अंबानी जर मध्ये पडले नसते, तर गणेश नाईक यांचीच लॉटरी लागली नसती,’ असा टोला पालकमंत्रिपदावरून लगावला.

म्हस्के यांनी वयावरून केलेल्या टीकेला मंत्री गणेश नाईक यांनीही जोरदर प्रत्युतर दिले आहे. ते म्हणाले, माणसाच्या वयाचे आकडे हा फक्त बहाणा असतो. जो कार्यक्षम असतो, तो कायम दिसतो आणि ते भविष्यकाळात दाखवून देऊ, असा टोला नाईकांनी म्हस्केंना लगावला.

मुकेश अंबानींमुळे गणेश नाईक यांना पालकमंत्रिपद मिळालं, असा आरोप शिवसेनेच्या चौघुले यांनी केला. त्यावर ‘ठीक आहे, मी काय नाकारत नाही. सगळ्यांच्या आशीर्वादामुळं मिळालं, असे उत्तर दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT