Uddhav-Thackrey-Raj-Thackerey Sarkarnama
मुंबई

Mumbai BMC elections : राज ठाकरेंची नाराजी दूर करण्यात उद्धव ठाकरेंना यश, मनसेला देणार दोन मोठी पदे; राजकीय घडामोडीना वेग, वादावर पडदा!

MNS Political Update News : दोन दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांच्या वाट्याला आलेल्या तीन स्वीकृत नगरसेवक पदासाठीचे उमेदवार जाहीर केले. तर दुसरीकडे शिवसेनेने त्यांच्या वाट्याचे एक जागा मनसेला सोडावी अशी मागणी केली होती.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना व राज ठाकरेंची मनसे एकत्र आली होती. मात्र, मनसे व ठाकरेंच्या शिवसेनेला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. सत्तास्थापनेपासून दूर राहावे लागले असल्याने दोन्ही पक्षांना विरोधी बाकावर बसावे लागले आहे. त्यातच दोन दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांच्या वाट्याला आलेल्या तीन स्वीकृत नगरसेवक पदासाठीचे उमेदवार जाहीर केले. तर दुसरीकडे शिवसेनेने त्यांच्या वाट्याचे एक जागा मनसेला सोडावी अशी मागणी केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत ठाकरेंच्या शिवसेनेने या जागेवरील तीन उमेदवार जाहीर केल्याने मनसेनी नाराजी व्यक्त केली.

त्यामुळे ठाकरे बंधू यांच्यात यामुळे ठिणगी पडणार असल्याची चर्चा रंगली असतानाच उद्धव ठाकरेंनी या वादावर पडदा टाकला असून येत्या काळात मुंबई महापालिकेत त्यांच्या वाट्याची दोन मोठी पदे मनसेला देणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडीना वेग आला असून याबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चाही झाली.

मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला येत असलेल्या तीन स्वीकृत नगरसेवक पदापैकी एक पद मनसेला देण्यात यावे अशी मागणी केली जात होती. मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेनं आपल्या कोट्यातील तीनही स्वीकृत नगरसेवक आपल्या पक्षातूनच देण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर आता मनसेची नाराजी दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मोठे पाऊल टाकले आहे. येत्या काळात ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला येत असेलल्या मुंबई महापालिकेतील दोन प्रभाग समितीचे अध्यक्षपदे देण्याचा प्रस्ताव दिला आहे.

त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्याची चर्चा आहे. मुंबई महापालिकेतील प्रभाग समिती अध्यक्षपदांवरून दोन्ही पक्षांमध्ये महत्त्वाच्या चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुंबई महापालिकेत निवडून आलेल्या संख्याबळानुसार ठाकरे यांच्या शिवसेनेकडे तब्बल सात प्रभाग समित्यांची अध्यक्षपदे येत आहेत. मात्र आपल्या मित्रपक्ष असलेल्या मनसेला त्यापैकी एक किंवा दोन प्रभाग समिती अध्यक्षपदे देण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे.

या विषयावर दोन्ही पक्षाच्या नेत्यामध्ये चर्चा झाली आहे. या संदर्भात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या उपस्थितीत मनसेचे (MNS) गटनेते यशवंत किल्लेदार आणि ठाकरे गटाचे सचिव सुरज चव्हाण यांच्यात बैठक झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत प्रभाग समिती अध्यक्षपद वाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. अजून एक ते दोन फेऱ्यांच्या बैठका होण्याची शक्यता असून त्यानंतर अंतिम निर्णय होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी एकत्र येत राजकीय समीकरण बदलले होते. मात्र निवडणुकीनंतर अवघ्या काही महिन्यांत दोन्ही पक्षांमध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. विशेषतः एकनाथ शिंदे यांची राज ठाकरे यांनी घेतलेली भेट या चर्चांना कारणीभूत ठरल्याचे बोलले जात होते. दरम्यान, ठाकरे गटाकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक यांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मनसेला स्वीकृत नगरसेवक पद मिळण्याची शक्यता जवळपास संपल्याची चर्चा आहे. यामुळे आता प्रभाग समिती अध्यक्षपद मनसेला देण्याबाबत चर्चा सुरु असल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT