EKnath shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

BMC Mayor election : मुंबईच्या महापौरपदाचा सस्पेन्स संपला? फडणवीस, शिंदेंच्या डिनर डिप्लोमसीनंतर 'या' चार रणरागिणी रेसमध्ये

BMC Mayor post News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात महापौर पदाबाबत चर्चा झाली. या दोघात झालेल्या डिनर डिप्लोमसीनंतर मुंबईच्या महापौरपदाचा सस्पेन्स संपला आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यातील महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या असल्यातरी काही ठिकाणी महापौर निवडीची प्रक्रिया रखडली होती. विशेषतः मुंबई महापालिकेत भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळूनही गेल्या काही दिवसापासून महापौर पदाबाबत भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत रस्सीखेच सुरु असल्याने तिढा सुटला नव्हता. मात्र, गुरुवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात महापौर पदाबाबत चर्चा झाली. या दोघात झालेल्या डिनर डिप्लोमसीनंतर मुंबईच्या महापौरपदाचा सस्पेन्स संपला आहे.

सीएम देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यामध्ये याचवेळी मुंबई महापालिकेचा महापौरपद कुणाला द्यायचे आणि स्थायी समितीसह इतर समित्यांवर कुणाची वर्णी लावायची यावर अंतिम निर्णय झाला. त्यामध्ये मुंबई महापालिकेसंबंधी सर्व निर्णय झाल्याची माहिती आहे.

त्यानंतर आता राजकीय घडामोडीना वेग आला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांच्या एकत्रित गटाची नोंदणी केली जाणार आहे. त्यासाठी कोकण भवनमध्ये दोन्ही पक्षाचे नगरसेवक जाणार असल्याचीही माहिती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्यात निर्माण झालेल्या पोकळीवरही या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप (BJP) महायुतीला जनतेने कौल दिला आहे. भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यापैकी कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. त्यानंतर आता भाजप आणि शिवसेनेनं सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. विशेषतः महापौर पदावरून या दोन्ही पक्षात जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत होती.

महापौर पदासाठी 'या' चार रणरागिणी रेसमध्ये

मुंबईच्या महापौरपद हे भाजपकडे जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. महापौरपद हे सर्वसाधारण गटातील महिलेसाठी आहे. त्यामुळे या पदासाठी आता भाजपच्या नगरसेविका राजश्री शिरवडकर, रितू तावडे, शितल गंभीर, योगिता कोळी या चार महिला नगरसेवकांची नावे आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातील बैठकीनंतरच सर्व पदांबाबत निर्णय होणार आहे. त्यामुळे आता उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT