Mumbai News : राज्यातील 29 महानगर पालिकेची निवडणूक पार पडली आहे. त्यामुळे आता सर्वांचेच महापौर पदाच्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप व एकनाथ शिंदे यांच्या महायुतीला काठावर बहुमत मिळाले आहे. दुसरीकडे या दोन पक्षातील महापौर पदाचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष11फेबुवारीला होत असलेल्या महापौर पदाच्या निवडणुकीकडे लागले आहे.
महापौर व उपमहापौर पदावर आता भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून महिलांची वर्णी लागणार आहे. त्यामुळे महापालिकेत महिलाराज असणार आहे. उपमहापौर पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन रणरागिणीची नावे चर्चेत आहेत.
मुंबई महापालिकेचे महापौरपद यंदा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. त्यामुळे यावेळी उपमहापौर पदावरही महिलाच विराजमान होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे यंदा मुंबई महापालिकेवर महिला राज असेल. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत यावेळी भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. तर भाजपचा (BJP) मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला 29 जागा मिळाल्या. त्यामुळे भाजपचा महापौर होणार असून शिंदेंच्या शिवसेनेचा उपमहापौर होणार आहे. उपमहापौर पदासाठीही दोन नावे चर्चेत आहेत
मुंबई महापालिका निवडणुकीत तब्बल 130 नगरसेविका निवडून आल्या आहेत. एकूण 227 प्रभागांपैकी 114 प्रभाग महिलांसाठी राखीव असताना यंदा 130 महिला निवडून आल्या आहेत. मुंबई महापालिकेत यंदा निवडून आलेल्या नगरसेविकांमध्ये सर्वाधिक नगरसेविका या भाजपच्या आहेत. त्याखालोखाल उद्धव ठाकरेंची शिवसेना, त्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना यांचे उमेदवार आहेत.
त्यावेळेसच्या निवडणुकीत भाजपच्या 49 नगरसेविका निवडून आल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (Shivsena) पक्षाच्या 38 नगरसेविका निवडून आल्या आहेत. तर शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या 19 नगरसेविका निवडून आल्या आहेत. उपमहापौर पदासाठी शिवसेना (शिंदे) पक्षाच्यावतीने माजी सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव आणि माजी नगरसेविका यामिनी जाधव यांची नावे चर्चेत आहेत.
2014 मध्ये महापौर पद हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले होते. त्यावेळी स्नेहल आंबेकर आणि यामिनी जाधव यांची नावे चर्चेत होती. तेव्हा यामिनी जाधव यांना महापौर पदाने हुलकावणी दिली होती. तर तृष्णा विश्वासराव या अनुभवी नगरसेविका असून 2014 च्या कार्यकाळात त्या सभागृहनेत्या होत्या. त्यामुळे या दोघींपैकी कोणाची तरी उपमहापौरपदावर वर्णी लागू शकते अशी चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.